रायगड : 2019 मध्ये सरकार स्थापनच्या वेळी प्रकाश सोळंके नाराज झाले होते आणि ते राजीनामा देण्याच्या तयारीत होते. त्यानंतर जयंत पाटील आणि मी त्यांना कार्याध्यक्ष पदाचाबाबत शब्द दिला होता. परंतु एक वर्षांनी वरिष्ठ म्हणतायत, थांब तूच रहा असं सांगत दिलेला शब्द जयंत पाटलांनी पाळला नाही. असा गौप्यस्फोट अजित पवारांनी कर्जत येथील सभेत केला. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
हेही वाचा…लोकसभेच्या कोणत्या जागा लढविणार ? अजित पवारांनी सगळंच सांगितलं, म्हणाले…
अध्यक्षपदाचा शब्द मला जयंत पाटील, अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी दिला होता. परंतु तो शब्द जयंत पाटलांनी पाळला नाही. केवळ घरी बोलवायचं, चहा आणि नाश्ता खाऊ घालवायचा, मात्र निवडीच्याबाबत काहीच नाही. आमदारकीचा राजीनामा देऊन घरी बसणार होतो. मग माझा राजीनामा थांबवला. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यावर ते म्हणत आहेत की आता अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष करावं. म्हणजे याचा अर्थ असा जयंत पाटील, तुम्ही घाण करणार आणि अजित पवार यांनी ती साफ करायची हे योग्य नाही. असं म्हणत प्रकाश सोळंके यांनी जयंत पाटलांवर जोरदार टिका केली.
हेही वाचा…जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी १३० जेसीबी तयार, १४० एकरवर सभा, पोलिस तैनात, जालन्यातील सभा वादळी ठरणार का ?
प्रदेशाध्यक्षपदाबाबत शरद पवार यांना दोनदा भेटलो होतो. त्यांनी मला शब्द देखील दिला होता. एक वेळ अशी आली की त्यांनी सोबत पत्र घेऊन जा. दोन-तीन दिवस मुंबई थांबायला सांगितले. मात्र मला पत्र मिळालं नसल्याचंही सोळंके यांनी सांगितलं. मी जे बोलतो ना, त्यातलं एक अक्षर चुकीचं आणि खोटं बोलणार नाही. कारण काय ? आपला परिवार आहे, कुटुंब आहे. आपण आपल्या घरात खरं बोललं पाहिजे. त्यामध्ये ज्यावेळेस मी देवेंद्र फडणवीसांसोबत एकत्र येत शपथ घेतली, ते सर्वाना माहित आहे. झालं गेलं गंगेला मिळालं असंही अजित पवारांनी म्हटलं .
READ ALSO :
हेही वाचा…आढळराव पाटील अजित गटात प्रवेश करणार अन् कोल्हेंच्या विरोधात निवडणुक लढणार ? लोकसभेच्या निवडणुकीसाठी रणनिती ठरली
हेही वाचा…”नालायक” नाही तर मग काय सांगू ? उद्धव ठाकरेंकडून शिंदेंचा पुन्हा ”नालायक” उल्लेख
हेही वाचा…रायगडचं पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांना मिळणार ? अजित पवारांनी दिले संकेत
हेही वाचा…सुळे आणि कोल्हेंच्या विरोधात अजित पवार गट निवडणुक लढवणार ? अजित पवारांनी स्पष्ट केलं, उमेदवार कोण ?
हेही वाचा…“त्याचे काय डोळे गेले आहेत का ?” एकेरी उल्लख करत जरांगे पाटलांचा भुजबळांवर हल्लाबोल