नागपूर : नितीनजींचे तुझेसे नाराज नही जिंदगी हैरान हू मैं.. हे आवडतं गाणं ते आवर्जून गातात तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायलेलं श्रीवल्ली देखील चांगलचं व्हायरल झालं आहे. त्यामुळा राजकारणात सगळे काही असूर आणि बेसूर नसतात काही त्यांच्यासारखे सुरेल असतात. असा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या. नागपूरचे लोकप्रिय खासदार तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारने आयोजित करण्यात आलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…अजितदादांचा गट बारामतीची जागा लढविणार, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या…
यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार कृपाल तुमाने, आमदार मोहन मते, कृष्णा खोपडे, आशिष जयस्वाल, संदीप जोशी आणि नागपूरमधील भाजपाचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच नागपूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा…“तर दोघांना खाली लोळवलं असतं”, जामीन मंजूर होताच दत्ता दळवींनी दिला इशारा
नितीन गडकरी साहेबांनी हाताळलेले एमएसआरडीसी खाते जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा ते कर्जाच्या बोज्याखाली होते. मात्र देवेंद्र फडणवीस मला म्हणाले की हे खाते आपण मिळुन एवढं मोठं करू की तुम्ही ते कधीच सोडणार नाही, आणि प्रत्यक्षात तसच घडलं. याच खात्यामुळे समृद्धी महामार्ग आणि अनेक प्रकल्प उभे राहिले आहेत याचा सार्थ अभिमान वाटत असल्याचेही एकनाथ शिंदेंनी सांगितले.
हेही वाचा…“जयंत पाटलांनी घाण करायची अन् अजित पवारांनी साफ करायची”, त्यामुळेच राष्ट्रवादीचा ‘हा’आमदार भडकला
दरम्यान, विदर्भातील लोकं ही मुळातच आपली कला आणि संस्कृती जपण्याचा आवर्जून प्रयत्न करतात. नितीन गडकरी साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्याला अपवाद नाहीत. गडकरी साहेब पक्के खवय्ये आहेतच पण त्यांच्या बोलण्यात सावजीचा झणझणीतपणा देखील आहे. त्यांनी या कार्यक्रमासाठी बोलावणं म्हणजे प्रेमळ आदेश असतो त्या आदेशाचे पालन करण्यासाठी या कार्यक्रमाला आलो असल्याचे यावेळी नमूद केले.
READ ALSO :
हेही वाचा…राहुल शेवाळेंना ठाकरे गट इंगा दाखवणार, लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरेंचा ‘हा’ शिल्लेदार सज्ज
हेही वाचा…“आरक्षणासाठी सरकारसोबत जनतेलाही वेठीस धरण्याचं काम”, भुजबळांची टिका
हेही वाचा…ठाकरे गटाची ‘ती’ मागणी नार्वेकरांनी फेटाळली, सत्तासंघर्षाची सुनावणी २२ तारखेपर्यंतच होणार
हेही वाचा…“..त्यामुळेच अनिल देशमुखांना मंत्रिपदाच्या यादीतून वगळलं,” अजित पवारांनी केला मोठा दावा
हेही वाचा…फडणवीसांनी लोकसभेच्या जागांचा अगोदरच जाहीर केलाय आकडा, अजित पवारांनी आज ४ जागा फिक्स केल्या, शिंदेंच्या वाट्याला किती?