ठाणे : कल्याण-डोंबिवलीतील वाहतुक कोंडीव फुटावी यासाठी सरकारने केलेल्या स्क्रिम म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या पॉकेटमनीसाठीचा स्कॅम आहे. असा हल्लाबोल मनसेचे आमदार राजू पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर केलाय. राजू पाटील यांनी यासंदर्भात एक फोटो देखील ट्विट केला आहे. त्यामुळे मनसे आणि शिंदेंमध्ये संघर्षाची ठिणगी पेटण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“आरक्षणासाठी सरकारसोबत जनतेलाही वेठीस धरण्याचं काम”, भुजबळांची टिका
शीळफाट्याच्या वाहतुक कोंडीने स्वत: चेच विक्रम मोडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र येथील लोकप्रतिनिधी असून वाहतुककोंडी सुटावी यासाठी रोज नव्यानव्या स्क्रिम घेऊन येतात. त्या स्किम नसाततच तर पॉकेटमनीसाठी केलेला स्कॅम असतो. अश्या चर्चा ठेकेदार वर्गात सुरू असल्याचं राजु पाटलांनी म्हटलं.
हेही वाचा…ठाकरे गटाची ‘ती’ मागणी नार्वेकरांनी फेटाळली, सत्तासंघर्षाची सुनावणी २२ तारखेपर्यंतच होणार
पुढे बोलतांना राजु पाटील म्हणाले की, गरोदर बायका, वृद्ध, रूग्ण सगले तासनतास ट्रॅफिकला सामोरे जातायत तेही आपल्या सुपुत्राच्या मतदारसंघात आहेत. मग महाराष्ट्राने काय अपेक्षा ठेवायच्या? कधीतरी सुचनांचा विचार करा, आणि कदाचित वाहतुक कोंडी कमी होईल. शक्य होईल तर तुमच्या पत्राला त्याचं श्रेय द्या अन् आमच्या सुचना ऐकण्यासठी वेळ द्या व शिळफाट्याच्या ट्रॅफिक जामचा शिक्का पुसा. असंही राजु पाटील यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“..त्यामुळेच अनिल देशमुखांना मंत्रिपदाच्या यादीतून वगळलं,” अजित पवारांनी केला मोठा दावा
दरम्यान, मनसे आणि राजु पाटलांमध्ये वाद सुरू असतानांच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राजु पाटील देखील होते. या भेटीत मराठी पाट्या तसेच शिळफाट्याच्या ट्रफिक जामबाबतही चर्चा झाल्याची माहिती समोर आलीय.
शीळफाट्याच्या वाहतुककोंडीने स्वतःचेच विक्रम मोडले. मुख्यमंत्री साहेब आपले पुत्र पण येथील लोकप्रतिनिधी आहेत, वाहतुककोंडी सुटावी यासाठी रोज नव्यानव्या ‘स्किम’ घेऊन येतात, त्या स्किम नसतातच,पॅाकेटमनीसाठी केलेला ‘स्कॅम’ असतो अश्या चर्चा ठेकेदार वर्गात सुरू आहेत. गरोदर बायका, वृध्द,… pic.twitter.com/KMGYcHJ56s
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) November 29, 2023
READ ALSO :
हेही वाचा…दादा भुसे पुर्ण XXX झालाय, माफी मागावी, १७८ कोटींचा आरोप करत भुसेंवर संजय राऊतांचा हल्लाबोल
हेही वाचा…‘बारामतीचा गड’ उद्धवस्त करण्यासाठी मतांची बेरीज झाली, ‘सुनेत्रा पवार’ नव्हे तर ‘सुळें’च्या विरोधात ‘हा’ तगडा उमेदवार मैदानात ?
हेही वाचा…“साडेचार वर्षात काय लफडी केलीत, त्याचे व्हिडीओ शुटिंग, सगळं बाहेर काढणार”, सुजय विखे पाटलांचा रोख नेमका कुणाकडे ?
हेही वाचा…“राजकारणात सगळे काही ‘असूर’ आणि ‘बेसूर’ नसतात, तर काही…”, गडकरी, फडणवीसांचा उल्लेख करत शिंदेंचं मोठं विधान
हेही वाचा…राहुल शेवाळेंना ठाकरे गट इंगा दाखवणार, लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरेंचा ‘हा’ शिल्लेदार सज्ज