पुणे : कर्जत येथील सभेत अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी भाजप आणि राष्ट्रवादी युतीबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केला. २००४ सोबत राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार होती. परंतु बाळासाहेबांच्या काही वक्तव्यामुळे भाजप अन् राष्ट्रवादीची युती तुटली असा आरोप पटेल यांनी केला आहे. त्यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय.
हेही वाचा…“मनसेच्या आमदाराचा श्रीकांत शिंदेंवर ‘पॉकेटमनी स्कॅम’ आरोप अन् राज ठाकरे पोहचले मुख्यमंत्र्यांच्या भेटीला”
२००४ मध्येच आम्ही भाजपसोबत जाणार होतो हे अशक्य असं मी म्हणणार नाही. आम्ही म्हणजे ते. मी नव्हे. पटेल माझ्या घरी येऊन काही तास थांबले. भाजपसोबत गेलं पाहिजे. वाजपेयींसोबत गेलं पाहिजे असा आग्रही विचार त्यांनी माझ्यसमोर मांडला. अनेकवेळा ते तास न् तास सांगत होते. पण ती गोष्ट स्विकारणे मला शक्य नाही. तुम्ही भाजपसोबत जाऊ शकता. माझा गैरसमज होणार नाही. असा सल्ला मी त्यांना दिला. पण माझा नकार बघून ते थांबले. त्यानंतर निवडणुक झाली. त्यांचा पराभव झाला. पक्षाने त्यांना केंद्रात मंत्री केलं. पराभूत उमेदवारालाही पक्षाने केंद्रीय मंत्रीपद दिलं ही वस्तुस्थिती लक्षा ठेवा असा टोलाही पटेल यांना शरद पवारांनी लगावला.
हेही वाचा…दादा भुसे पुर्ण XXX झालाय, माफी मागावी, १७८ कोटींचा आरोप करत भुसेंवर संजय राऊतांचा हल्लाबोल
दरम्यान, आपल्याला अनेक गोष्टी माहीती आहे. त्यावर पुस्तक लिहावं लागेल, असा इशारा प्रफुल्ल पटेल यांनी दिला. त्यावर त्यांच्या पुस्तकाची मी वाट बघतोय. त्यांनी पुस्तक लिहावं. लोक पक्ष सोडून का जातात यावर त्यावर चॅप्टर लिहावा. त्यांच्या घरी ईडीची धाड का पडली? यावर त्यांनी एखादा चॅप्टर लिहावा. दिल्ली किंवा मुंबईचे घर आहे. त्यातील किती मजले ईडीे ताब्यात घेतले आणि का घेतले तेही लिहावं. त्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडेल. असा टोलाही शरद पवारांनी लगावला.
READ ALSO :
हेही वाचा…मावळात श्रीरंग बारणेंच उमेदवार, उदय सामंताचं विधान, राष्ट्रवादी अन् भाजपमध्ये वाढली धाकधूक
हेही वाचा…“स्मशानातून आवाज येतात “माझ्या खुन्याला पकडा”, आव्हाडांच्या ‘या’ टिकेला अजित पवार गटाचं उत्तर
हेही वाचा…ठरलं तर मग..! शरद पवार गट लोकसभेच्या बारामतीसह ‘या’ पंधरा ते सोळा जागा लढविणार
हेही वाचा…“ट्रिपल इंजिन, ट्रिपल वसुली”, मुंबईत तब्बल प्रतिदिन १.६३ कोटी रूपयाची वसुली, कोल्हेंनी सांगितला धक्कादायक अनुभव
हेही वाचा…‘इंद्रायणी रिव्हर सायक्लॉथॉन’ टीमचा विश्वविक्रम; उद्या होणार रॅली! लाँगेस्ट लाईन ऑफ बायसिकल्स स्टॅटिक्स’च्या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद