पुणे : कर्जतमधील शिबिरात अजित पवारांनी लोकसभेच्या शिरूर, बारामती, सातारा आणि रायगड जागा लढविणार असल्याचे संकेत दिल्यानंतर आज शरद पवार गटाची पुण्यात बैठक पार पडत आहे. आज दुपारी शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. त्याआधी राष्ट्रवादीच्या युवक राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी लोकसभा निवडणुकांबाबत मोठं भाष्य केलंय.
हेही वाचा…“साडेचार वर्षात काय लफडी केलीत, त्याचे व्हिडीओ शुटिंग, सगळं बाहेर काढणार”, सुजय विखे पाटलांचा रोख नेमका कुणाकडे ?
पुढच्या वर्षी एप्रिल ते मे महिन्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत. पक्ष फुट प्रकरणानंतर राष्ट्रवादीच्या चार जागांवर पवार विरूद्ध पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे. कारण अजित पवारांनी जागा लढण्याचा सुतोवाच केल्यानंतर लोकसभेच्या १५ ते १६ जागा लढविणार असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“राजकारणात सगळे काही ‘असूर’ आणि ‘बेसूर’ नसतात, तर काही…”, गडकरी, फडणवीसांचा उल्लेख करत शिंदेंचं मोठं विधान
बारामतीसह सातारा, शिरूर, रायगड या लोकसभा मतदारसंघासह दिंडोरी, रावेर, अमरावती, भंडारा यासह १५ ते १६ जागा लढविणार आहोत. असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे. जागावाटपाबाबत महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि काॅंग्रेससोबत चर्चा करणार असल्याचंही जयंत पाटलांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…राहुल शेवाळेंना ठाकरे गट इंगा दाखवणार, लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरेंचा ‘हा’ शिल्लेदार सज्ज
दरम्यान, अजित पवारांनी लोकसभा निवडणुकांबाबत भाष्य केल्यानंतर शरद पवार गट देखील सक्रीय झाला आहे. यातच पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय येथे शरद पवार गटाच्या आमदारांची बैठक होणार आहे. यातच कर्जत येथील शिबिरात अजित पवारांनी गंभीर आरोप केले होते. त्यावर आज सांयकाळी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार काय प्रत्युत्तर देणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“ट्रिपल इंजिन, ट्रिपल वसुली”, मुंबईत तब्बल प्रतिदिन १.६३ कोटी रूपयाची वसुली, कोल्हेंनी सांगितला धक्कादायक अनुभव
हेही वाचा…‘इंद्रायणी रिव्हर सायक्लॉथॉन’ टीमचा विश्वविक्रम; उद्या होणार रॅली! लाँगेस्ट लाईन ऑफ बायसिकल्स स्टॅटिक्स’च्या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
हेही वाचा…“मनसेच्या आमदाराचा श्रीकांत शिंदेंवर ‘पॉकेटमनी स्कॅम’ आरोप अन् राज ठाकरे पोहचले मुख्यमंत्र्यांच्या भेटीला”
हेही वाचा…दादा भुसे पुर्ण XXX झालाय, माफी मागावी, १७८ कोटींचा आरोप करत भुसेंवर संजय राऊतांचा हल्लाबोल
हेही वाचा…‘बारामतीचा गड’ उद्धवस्त करण्यासाठी मतांची बेरीज झाली, ‘सुनेत्रा पवार’ नव्हे तर ‘सुळें’च्या विरोधात ‘हा’ तगडा उमेदवार मैदानात ?