मुंबई : राज्यात मागील काही वर्षात राज्यातील दोन मोठी पक्ष फोडण्यात आली. यावरून भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख चाणक्य असा करण्यात आला. यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टिका केली आहे. त्या भिवंडीत बोलत होत्या. भाजपचे अनुसूचित जमाती मोर्चा ठाणे जिल्ह्याध्यक्ष महादेव घाटाळ यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यावेळी सुषमा अंधारे यांनी जोरदार टिका टिप्पणी केली.
हेही वाचा…निवडणुकांचा जल्लोष होत असतांना भाजपच्या दोन्ही गटात जोरदार राडा, 23 जणांवर गुन्हा दाखल
महाप्रबोधन यात्रेत कपिल पाटील यांचा स्पेशल एपिसोड बनवणार आहे. त्यामुळे इलाका तुमचा आणि धमाका आमचा राहील. असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला. यातच देवेंद्र फडणवीस चाणक्य नसून जुगाडू आहेत. त्यांनी माणसं घडवली नाही तर त्यांनी पक्षातील माणसं संपवली आहेत. असा घणाघात सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर चढवला.
हेही वाचा…विद्यमान अन् भावी मुख्यमंत्र्यांला घाम फोडणारा भाजपचा बाहुबली कोण ? राजकारणात एकच चर्चा
दरम्यान, पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, भाजपा मराठा आणि ओबीसी समाजाला आपापसात झुंजवत कलगीतुरा करत आहे. एका नेत्याने छत्रपती यांची शपथ घेऊन मी मराठा आरक्षण देणार असे सांगायचं तर एकाने ओबीसींच्या सोबत आहे असे सांगायचे . नक्की तुम्ही कोणाच्या सोबत आहात हे कळत नाही. आरक्षणासाठी कायदा करण्याचे अधिकार राज्याकडून केंद्राकडे गेले आहेत. भाजपाचे आरक्षण देण्याची खरी नियत असेल तर त्यांनी विधानसभेत कायदा करून केंद्राकडे पाठवावा. असंही त्या म्हणाल्या.
READ ALSO :
हेही वाचा…“गॅरंटी बोले तो मोदी जी, पनौती बोले तो..,”चित्रा वाघ यांना राहुल गांधींवर निशाणा
हेही वाचा…“मुंबईची जलवाहिनी फुटली, लोकांचे मोठे हाल,” आदित्य ठाकरेंचे पालिकेला कडक सवाल
हेही वाचा…विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाची सत्ता उलथावून लावली, उपमुख्यमंत्र्यांचा मोठा पराभव, मुख्यमंत्रीही पिछाडीवर
हेही वाचा…काका काॅंग्रेसचा तर पुतण्या भाजपचा..! रंगला मोठा डाव, म्हणाले की, “हाताच्या मदतीशिवाय कमळ कसे फुलणार”
हेही वाचा…शिंदेंचा मोठा मंत्री अडचणीत येणार ? व्हिडीओ व्हायरल करण्याचा जरांगे पाटलांनी दिला इशारा