नागपूर : राज्याच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या ७ डिसेंबर पासून नागपुरात सुरू होत आहे. यातच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह कॅबिनेट मंत्र्यांची अधिवेशनादरम्यान निवासाची सोय नागपुरात केली जातेय. यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिव्हिल लाईन्स परिसरात विजयगड बंगला देण्यात आला असून त्याच्या दुरूस्तीसाठी तब्बल १ कोटी रूपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सिंधुदुर्गात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण
नागपुर येथे होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी अजित पवारांना विजय गड बंगला देण्यात आला आहे. या बंगल्याच्या दुरूस्तीचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मागच्या महिन्यातच सुरू केलं होतं. बंगल्यात दुरूस्ती तसेच रंगरंगोटी आणि नवे बांधकाम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १ कोटी खर्च करण्यात आले आहे. या बंगल्यात अजित पवारांचा बंगला दुरूस्तीनंतर फाईव्ह स्टार प्रमाणे सजला आहे. विजयगड बंगल्यावर लॉर्ड गार्डन, हॉल अशा सुविधा आहेत. त्या बंगल्या शेजारीच अजित पवारांच्या खाजगी स्वय सहाय्यकाचाही बंगला आहे.
हेही वाचा…हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधी ‘आप’ला मिळाली चांगली बातमी
दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत तसेच नागपुरातील दौऱ्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर कॅबिनेट मंत्र्यांसाठी बंगले आहे. मुख्यमंत्र्यांसाठी रामगिरी, तर उपमुख्यमंत्र्यांसाठी देवगिरी हे बंगले आहेत. मुंबईतील वर्षा बंगल्यानंतर देवगिरी बंगला हा भव्य मानला जातो. फडणवीसांनी हा बंगला त्यांच्याकडे कायम ठेवला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“पुणे लोकसभेसाठी जोशींचं नाव चर्चेत, परंतु पक्षाने उमेदवारी दिली तर मीच लढवणार”, धंगेकरांचं मोठं विधान
हेही वाचा…अमरावतीत शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा, जयंत पाटील, अनिल देशमुख, पवार मोर्चात हजर राहणार
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश, दापोलीत राष्ट्रवादीला मोठा धक्का
हेही वाचा…ललित पाटील प्रकरणी कारवाईंच्या हालचाली वाढल्या, बड्या अधिकाऱ्याला अटक
हेही वाचा…फक्त १२ वी पास, अंगावर ११ गुन्हे, तरीही ‘या’ नेत्याने मुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्र्याला पाणी पाजलं, निवडणुकीत मिळवला दणदणीत विजय