मुंबई : धारावी पुनर्विकाच्या मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकार आणि विकासक अदानी समुह यांच्याविरोधात येत्या १६ तारखेला ठाकरे गट मोर्चा काढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आज पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्याला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
हेही वाचा…अधिवेशनासाठी अजित पवारांचा ‘विजयगड’ बंगला सजला, दुरूस्तीसाठी तब्बल १ कोटीचा केला खर्च
धारावीमध्ये धारावीकरांना घर मिळालीच पाहिजेत. पण सोबतच गिरणी कामगार, पोलिस कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांनाही तिथं घरं देण्यात यावीत. टीडीआरबाबतही गोंधळ आहे. इतर विकासकांनाही टीडीआर घ्यायचा असेल तर ४० टक्क्यांची अट टाकत तो टीडीआर अदानींकडूनच विकत घ्यायला लागेल. मात्र यासाठी एक वेगळी कंपनी स्थापन करायला हवी. जसा बीडीडी चाळींचा विकास म्हाडाकडून केला जातो, तसा धारावीचा विकास सरकारने करावा. टीडीआर सरकारकडून विकत घेतला गेला पाहिजे. अदानींचा विकास कसा होईल, याचा विचार या सगळ्यात गेला आहे. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“पुणे लोकसभेसाठी जोशींचं नाव चर्चेत, परंतु पक्षाने उमेदवारी दिली तर मीच लढवणार”, धंगेकरांचं मोठं विधान
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टिकेवर भाजपने प्रत्युत्तर दिलंय. उद्धव ठाकरे तुमचा आणि हिंदुत्ववाचा आता काही संबंध उरला आहे का? ज्यादिवशी सत्तेसाठी तुम्ही काँग्रेससोबत जाऊन बसला त्याच दिवशी तुम्ही हिंदुत्वाचे विचार गुंडाळून ठेवलेत. राम मंदिर आमच्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही तो आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे. राम मंदिराच्या मुद्द्यांवर मंदिर वही बनाऐंगे लेकीन तारीख नहीं बताऐंगे अशी टीका तुम्हीच केली होती पण आता २२ जानेवारी रोजी मंदिराचं लोकार्पण होतंय. त्यामुळे तुमच्या पोटात गोळा उठला आहे. कर्नाटक, तेलंगणात काँग्रेस जिंकली की लोकशाहीचा विजय आणि राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशात भाजप जिंकली की इव्हीएमवर शंका. किती रडारड करणार? असा सवाल भाजपने उद्धव ठाकरे यांना केला आहे.
उद्धव ठाकरे तुमचा आणि हिंदुत्ववाचा आता काही संबंध उरला आहे का? ज्यादिवशी सत्तेसाठी तुम्ही काँग्रेससोबत जाऊन बसला त्याच दिवशी तुम्ही हिंदुत्वाचे विचार गुंडाळून ठेवलेत. राम मंदिर आमच्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही तो आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे.
राम मंदिराच्या मुद्द्यांवर मंदिर वही…
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) December 5, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“चार राज्यांचा निवडणुका सोडा आता मुंबई पालिकेची निवडणूक घेऊन दाखवा”, उद्धव ठाकरेंचं आवाहन
हेही वाचा…आ’त्म’ह’त्या’ नाही, खूनी सरकार…! जितेंद्र आव्हाडांची राज्य सरकारवर जहरी टिका
हेही वाचा…पदवीधर निवडणुकांसाठी ठाकरेंची मोठी रणनिती, ‘या’ दोन मोठ्या नेत्याला संधी
हेही वाचा…तीन राज्यांत भाजपची एकहाती सत्ता, अजितदादा गटात उत्साह वाढला
हेही वाचा…जरांगे पाटलांच्या सभेत चोरांचा सुळसुळाट, अडीच ते तीन लाखांवर मारला डल्ला, कार्यकर्त्यांनी दिला बेदम मार