मुंबई : पदवीधर मतदारसंघासाठी येत्या काही महिन्यात निवडणुक लागू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आता ठाकरे गटाकडून जय्यत तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची मातोश्रीवर महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांबाबत चर्चा करण्यात आली असून नावंही जवळपास निश्चित झालं आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश, दापोलीत राष्ट्रवादीला मोठा धक्का
पदवीधर निवडणुकांसाठी ठाकरे गटाकडून नावं आता जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी ठाकरे गटाचे उमेदवार ठरले आहेत. मुंबई पदवीधर मतदारसंघाकडून वरूण सरदेसाई किंवा अनिल परब यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर कोकण पदवीधर मतदारसंघात किशोर जैन यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे. ३० डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
हेही वाचा…ललित पाटील प्रकरणी कारवाईंच्या हालचाली वाढल्या, बड्या अधिकाऱ्याला अटक
दरम्यान, पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करणे, नमुना १८ किंवा नमुना १९ द्वारे दावे व हरकती स्वीकारणे, हस्तलिखिथे तयार करणे व प्रारूप मतदार याद्यांची छपाई करणे, प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धि करणे, दावे व हरकती निकाली काढून पुरवणी यादी तयार करून छपाई करणे आदी कामे केली गेली आहे. त्यामुळे आता कोणत्याही महिन्यात यासाठी निवडणुक आयोगाकडून पदवीधर निवडणुक जाहीर होण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…तीन राज्यांत भाजपची एकहाती सत्ता, अजितदादा गटात उत्साह वाढला
हेही वाचा…जरांगे पाटलांच्या सभेत चोरांचा सुळसुळाट, अडीच ते तीन लाखांवर मारला डल्ला, कार्यकर्त्यांनी दिला बेदम मार
हेही वाचा…अधिवेशनासाठी अजित पवारांचा ‘विजयगड’ बंगला सजला, दुरूस्तीसाठी तब्बल १ कोटीचा केला खर्च
हेही वाचा…“पुणे लोकसभेसाठी जोशींचं नाव चर्चेत, परंतु पक्षाने उमेदवारी दिली तर मीच लढवणार”, धंगेकरांचं मोठं विधान
हेही वाचा…अमरावतीत शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा, जयंत पाटील, अनिल देशमुख, पवार मोर्चात हजर राहणार