मुंबई : राष्ट्रवादी पक्ष फुट प्रकरणानंतर सुरूवातीला अजित पवार गटाने शरद पवारांबाबत सौम्य भूमिका घेतली होती. मात्र राजकीय वातावरणात बदल झाल्यानंतर अजित पवार गट आक्रमक होतांना दिसत आहे. यातच कर्जत येथील सभेत अजित पवारांनी राष्ट्रवादी जितेंद्र आव्हाडांबाबत खोचक टिप्पणी केली होती. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशात भाजप जिंकली की EVM वर शंका, किती रडारड करणार ? भाजपचं ठाकरेंना प्रत्युत्तर
अजित पवार यांनी कर्जत येथील पक्षाच्या शिबिरात जितेंद्र आव्हाडांच्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख करत टिका केली होती. आता त्यावर जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी आपल्या एक्स खात्यावर पोस्ट लिहून अजित पवारांवर मिश्किल टिप्पणी केली. यावेळी जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांच्या वाढलेल्या पोटाचा फोटोही शेअर केला आहे.
हेही वाचा…“चार राज्यांचा निवडणुका सोडा आता मुंबई पालिकेची निवडणूक घेऊन दाखवा”, उद्धव ठाकरेंचं आवाहन
दरम्यान, जितेंद्र आव्हाडांनी एक्स खात्यावर अजित पवारांवर खोचक टिप्पणी केली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की, दादा, त्यादिवशी पत्रकार परिषदेत तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला. तेव्हा मला वाटलं की तुम्ही व्यायाम करून सिक्स पॅक अब्ज तयार केले असतील. पण हा परवाचा फोटो आहे. त्यात तुमची ढेरी दिसत आहे. हाहा.
दादा त्या दिवशी पत्रकार परिषदेत तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला तेव्हा मला वाटले की तुम्ही व्यायाम करुन 6 pack abs केले असतील पण हा पर्वाचा फोटो तुमची ढेरी दाखवतो.. haha pic.twitter.com/mNdtUIeb79
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 5, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“हिवाळी अधिवेशनात शरद पवार गटाचे आमदार सरकारला घेरणार,” जयंत पाटलांनी दिल्या सूचना
हेही वाचा…“मंत्रिपदासाठी आता फक्त देवाला कौल लावायचा बाकी राहिलाय”, शिंदेंचा ‘हा’ आमदार अजूनही मंत्रीपदासाठी आतूर
हेही वाचा…“पंकजा मुंडे आणि माझ्यातील राजकीय संघर्ष संपला”, बीडमध्ये धनंजय मुंडेंचं मोठं विधान
हेही वाचा…“कराड आम्हाला अजूनही नगरसेवकच वाटतात”, भागवत कराडांचं आव्हान फेटाळत खैरेंचा लोकसभेवर दावा
हेही वाचा…“मनोज जरांगे पाटलांना ‘या’ ठिकाणी दाखवले काळे झेंडे, वाद आणखी चिघळणार “?