पुणे : ललित पाटील ड्रग्जप्रकरणाबाबत अनेक मोठमोठ्या राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहे. यातच ललित पाटील प्रकरणात पुन्हा एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. ससून रूग्णालयाचा वैद्यकीय अधिकारी प्रवीण देवकाते याला पुणे पोलिसांकडून अटक झाली आहे. त्याआधी आता ललित पाटील प्रकरणात सहा जणांवर कोर्टाकडून दोषारोप दाखल केलं आहे.
हेही वाचा…आता राष्ट्रवादीच्या कार्यालयावरून दोन गटात वाद, अजित पवार गट म्हणतो की,..
ललितचा भाऊ, साथीदारांसह मैत्रिणांचा देखील दोषारोप पत्रामध्ये समावेश करण्यात आला आहे. अमली पदार्थ तस्कर ललित पाटील पलायन प्रकरणी एकूण १४ पैकी सहा आरोपींविरूद्ध प्रथमर्वग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं आहे. ललितच्या मैत्रिणी अर्चना किरण निकम, अॅड़. प्रज्ञा कांबळे, ललितचा भाऊ भूषण पाटील, साथीदार अभिषेख बलकवडे, विनय अऱ्हाना, त्याचा चालक दत्तात्रेय डोके यांच्याविरोधात आरोपपक्ष दाखल करण्यात आलं आहे.
हेही वाचा…“आरोग्य मंत्रालय भ्रष्टाचाराचे कुरण झालंय,” संजय राऊतांनी पुराव्यासह शिंदेंना धाडलं पत्र
दरम्यान, ललित पाटील प्रकरणात ललित पाटीलला मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी प्रवीण देवकाते याला अटक केली आहे. त्याआधी प्रवीण देवकाते याला संबंधित विभागातून निलंबित करण्यात आलं होतं. निलंबित झाल्यानंतर काल या अधिकाऱ्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. ललित पाटीलला त्याच्या आजारात आणि पळून जाण्यास देखील देवकाते यांनी मदत केल्याचा पुणे पोलिसांचा आरोप आहे.
READ ALSO :
हेही वाचा…हिवाळी अधिवेशनापुर्वी विरोधकांची जोरदार बॅनरबाजी, हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार ? पाहा व्हिडीओ
हेही वाचा…“विश्वासघाती उद्धव ठाकरे सेना इतिहास जमा होणार”, किरीट सोमय्यांनी ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…“भुजबळांना लोळवलं नाही तर नाव बदलून ठेवणार”, जरांगे पाटलांचा भुजबळांना इशारा
हेही वाचा…उद्धव ठाकरे, पटोले आणि बावनकुळेंची एकाच ठिकाणी व्यवस्था, अधिवेशनासाठी जय्यत तयारी
हेही वाचा…राजस्थान हादरल..! राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षाची गोळी घालून ह’ त्या , व्हिडीओ व्हायरल