मुंबई : राष्ट्रवादी पक्ष फुट प्रकरणानंतर सुरूवातीला अजित पवार गटाने शरद पवारांबाबत सौम्य भूमिका घेतली होती. मात्र राजकीय वातावरणात बदल झाल्यानंतर अजित पवार गट आक्रमक होतांना दिसत आहे. यातच कर्जत येथील सभेत अजित पवारांनी राष्ट्रवादी जितेंद्र आव्हाडांबाबत खोचक टिप्पणी केली होती. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. त्यावर आता पुन्हा अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी पलटवार केला आहे.
हेही वाचा…“पक्ष आणि कार्यालय आमचेच आहे”,अधिवेशनापुर्वी राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमनेसामने
अजित पवार यांनी कर्जत येथील पक्षाच्या शिबिरात जितेंद्र आव्हाडांच्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख करत टिका केली होती. त्यावर जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी आपल्या एक्स खात्यावर पोस्ट लिहून अजित पवारांवर मिश्किल टिप्पणी केली. दादा, त्यादिवशी पत्रकार परिषदेत तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला. तेव्हा मला वाटलं की तुम्ही व्यायाम करून सिक्स पॅक अब्ज तयार केले असतील. पण हा परवाचा फोटो आहे. त्यात तुमची ढेरी दिसत आहे. हाहा. असं आव्हाडांनी म्हटलंय.
हेही वाचा…“ऐनवेळी भाजपने दगाफटका केल्यास..,” शिंदे गटाने नेमले ३९ लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षक
दरम्यान, तुम्ही व्याकरण दुरुस्त करा राव.. (परवा )असा शब्द असायला हवा होता. मात्र अजित”पर्व” या शब्दाने तुमच्या व्याकरणाची वाट लावली.. तुम्ही चक्क परवा ऐवजी पर्वा? कशाला मनस्ताप करुन घेताय इतका? असा खोचक सवाल करत मिटकरींनी आव्हाडांना डिवचलं आहे.
तुम्ही व्याकरण दुरुस्त करा राव.. (परवा )असा शब्द असायला हवा होता मात्र अजित”पर्व” या शब्दाने तुमच्या व्याकरणाची वाट लावली.. तुम्ही चक्क परवा ऐवजी पर्वा? 😆कशाला मनस्ताप करुन घेताय इतका? https://t.co/YRGE3WbRcZ
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 6, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“याचा विसर आपल्याला कदाचित पडायला लागलाय”, राज ठाकरेंनी ट्विट केलं तीन फोटो
हेही वाचा…केंद्रीय मंत्र्यांसह भाजपच्या ‘या’ १० खासदारांनी दिला राजीनामा, कारण आलं समोर
हेही वाचा…“उठले की खुपसले नात्यात नाक, हेच काम उरले का राजकारणात ?” रूपाली पाटलांचा सवाल
हेही वाचा…“दादर स्थानकाचं नामांतर ‘चैत्यभूमी’ करावी ही कोट्यवधी भीम अनुयायांची मागणी ;”
हेही वाचा…हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार ? विरोधकांचा चहापानावर बहिष्कार