मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी करणार आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वात हे एसआयटी पथक काम करणार असून दिशा सालियान प्रकरणात ठाकरेंच्या चौकशीची मागणी सातत्याने काही आमदार करत होते. यातच आजपासून नागपुर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या पुर्वीच विरोधकांची धार कमी करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याची चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…“दादर स्थानकाचं नामांतर ‘चैत्यभूमी’ करावी ही कोट्यवधी भीम अनुयायांची मागणी ;”
मागच्या हिवाळी अधिवेशनात देखील भाजप नेते नितेश राणे यांनी दिशा सालियान प्रकरणी एसआयटी चौकशी लावावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता मुंबई उच्च न्यायालयात आदित्य ठाकरे यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा…हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार ? विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी करणारी याचिका राशिद खान पठाण यांनी केली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा १४ जून २०२० दिवशी मृत्यू झाला होता. त्यानंतर पाच दिवसानंतरच त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिचा १९ जुन २०२० रोजी संशयरित्या मृत्यू झाला होता. त्यानंतर या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव जोडण्यात आलं होतं.
READ ALSO :
हेही वाचा…“त्यामुळेच चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची भूमिका आघाडी सरकारने घेतली”, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
हेही वाचा…“अजित “पर्व” या शब्दाने तुमच्या व्याकरणाची वाट लावली”,अजित दादाच्या आमदाराने आव्हाडांना डिवचलं
हेही वाचा…“याचा विसर आपल्याला कदाचित पडायला लागलाय”, राज ठाकरेंनी ट्विट केलं तीन फोटो
हेही वाचा…केंद्रीय मंत्र्यांसह भाजपच्या ‘या’ १० खासदारांनी दिला राजीनामा, कारण आलं समोर
हेही वाचा…“उठले की खुपसले नात्यात नाक, हेच काम उरले का राजकारणात ?” रूपाली पाटलांचा सवाल