नागपूर : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी वैद्यकीय जामीनावर बाहेर असलेले राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी आपली भूमिका अप्रत्यक्षपणे स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी पक्ष फुटीप्रकरणानंतर नवाब मलिक कोणत्या गटात जाणार ? याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. त्यावर नवाब मलिकांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. परंतु आज नवाब मलिक हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांच्या बाजूच्या बाकावर बसले. त्यानंतर नवाब मलिक अजित पवार गटात आल्याचा दावा अनेकांनी केला.
हेही वाचा…अधिवेशनाच्या आधीच सरकार विरोधकांची धार कमी करणार ? आदित्य ठाकरेंची ‘या’ प्रकरणात चौकशी होणार
अनेक राजकीय चर्चांनंतर नवाब मलिकांनी आपला निर्णय घेतला आहे. हिवाळी अधिवेशाच्या वेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने सभागृहात शेवटच्या बाकावर बसले. त्याआधी विधिमंडळाच्या परिसरात येताच सर्वप्रथम अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर अनिल पाटील यांच्यासोबत त्यांनी अजित पवार गटाच्या कार्यालयात गेले. त्यावरून नवाब मलिक अजित पवार गटात असल्याचं स्पष्ट झालंय. यातच सभागृहात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार जुंपली.
हेही वाचा…“त्यामुळेच चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची भूमिका आघाडी सरकारने घेतली”, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
दरम्यान, नवाब मलिकांच्या प्रश्नावर अजित पवाराने आपली प्रतिक्रिया दिली. सभागृहात कुणी कुठे बसावं हा संपूर्ण अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे. त्यामुळे त्यांना मधल्या काळात काय-काय घटना घडल्या ते तुम्हाला माहिती आहे. ते आज सकाळी आले. त्यांचा मला फोन आला. मलाही कळल्यानंतर मी त्यांचं स्वागत आहे म्हणून फोन केला होता. असं अजित पवारांनी म्हटलंय.
देशद्रोहींच्या मांडीला मांडी लावून बसणार नसल्याचे सत्ताधारी म्हणाले होते. ते आता त्यांनी स्पष्ट करावे. असं अंबादास दानवेंनी म्हटलं. त्यावर आम्ही कुणाच्याही मांडीला मांडी लावून बसलो नसल्याचा पलटवार देवेंद्र फडणवीसांनी केला. यामुळे सभागृहात मोठा गोंधळ बघायला मिळला. तर शोक प्रस्तावानंतर विधिमंडळाचं कामकाज उद्या अकरापर्यंत स्थगित करण्यात आलं.
READ ALSO :
हेही वाचा…“SIT चौकशी होणार असल्याने आदूने प्रवासाची “दिशा” बदलून थेट दुबई गाठलीय”, शिंदे गटाने आदित्य ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…अजित पवार गटाच्या आमदारांना मिळणार मोठं गिप्ट, अधिवेशन संपताच होणार मंत्रिमंडळाचा विस्तार
हेही वाचा…रायगड लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत संघर्ष, कुणाला मिळणार लोकसभेची जागा ?
हेही वाचा…“रेटून खोटे बोलण्यात फडणवीस साहेबांचा हात कुणीच धरू शकत नाही”
हेही वाचा…“जितेंद्र आव्हाड हे राजकारणातील राखी सावंत”, अजित पवार गटाच्या ‘या’ नेत्याने आव्हाडांना डिवचलं