पुणे : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला वादळी सुरूवात झाली आहे. वैद्यकीय जामीनावर बाहेर असलेले राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाजूने सभागृहात बसले. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. त्यावरून देवेंद्र भाऊ सरडेसुद्धा लाजून आत्महत्या करतील हो, असा खोचक टोला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला. त्यात त्यांनी काही भाजपच्या आक्रस्ताळ्या बायका असाही उल्लेख केला. त्यावरून आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि सुषमा अंधारे यांच्यात जोरदार टिका टिप्पणी सुरू झालीय.
हेही वाचा…रायगड लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत संघर्ष, कुणाला मिळणार लोकसभेची जागा ?
सभागृहात आज देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांचा राजीनामा तेव्हाच का घेतला नाही ? असा अत्यंत सादसुदपणाने प्रश्न विचारला. त्यावर पुजा चव्हाणांवर बलात्कार करून हत्या करण्याचा प्रयत्न केला. याचा आरोप मंत्री संजय राठोड यांच्यावर तुम्हीच केला होता. त्यानंतर तुमच्याच पक्षाच्या आक्रसताळ्या बायकांना पुढे करत तुम्ही संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर माझ्या पक्षानेही तो राजीनामा घेतला होता. परंतु त्याच संजय राठोड यांना तुम्हीच तुमच्या पंगतीला बरोबरीने बसूनही घेतले. तेच तुम्ही नवाब मलिकांच्या बाबतीत करत आहात. तुम्हाला कसं जमतंय? देवेंद्र भाऊ सरडेसुद्धा लाजून आत्महत्या करतील असा खोचक टोलाही सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
हेही वाचा…“रेटून खोटे बोलण्यात फडणवीस साहेबांचा हात कुणीच धरू शकत नाही”
त्यानंतर सुषमाताई तुमच्या बाबतीत तर कित्येक सरडे दररोज आत्महत्या करतात. हिंदू देवी-देवतांबद्दल घाणेरडी विधाने करणे वंदनीय हिंदू ह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची टिंगल उडविणे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या बद्दल केलेली विधाने विसरलात का ? आणि आता त्यांचेच गोडवे गाताहेत. मातोश्रीभोवती असे सरडे नियमित फिरत असतात. फार मातोश्रीवर चकरा मारू नका. नाही तर तेथील सरडेही आत्महत्या करतील. असा खोचक टोला चित्रा वाघ यांनी लगावला होता. त्यावर मी नुसतं “भाजपच्या आक्रस्ताळ्या बायका” म्हटलं आणि माझा शब्द खरा करत आक्रस्ताळे बाई उडता तीर अंगावर घ्यायला सज्ज झाल्या. असा पलटवार सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर केला.
मी नुसतं “भाजपच्या आक्रस्ताळ्या बायका” म्हटलं
आणि माझा शब्द खरा करत आक्रस्ताळे बाई उडता तीर अंगावर घ्यायला सज्ज झाल्या.
आपले मनःपूर्वक अभिनंदन.
🤣🤣🤣— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) December 7, 2023
सुषमाताई….तुमच्या बाबतीत तर कित्येक सरडे दररोज आत्महत्या करतात
हिंदू देवी-देवतांबद्दल घाणेरडी विधाने करणे वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची टिंगल उडविणे
उद्धव जी आणि आदित्य ठाकरे बद्दल तुम्ही केलेली विधाने विसरलात की काय..?
आणि
आज तुम्ही त्यांचेच गोडवे गाताय…… pic.twitter.com/RD5kZ492VF— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 7, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“देवेंद्र भाऊ सरडा सुद्धा बघून आत्महत्या करेल हो..!” संजय राठोड, नवाब मलिक प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा टोला
हेही वाचा…“विरोधकांच्या घोषणानंतर अखेर कुंभकर्ण सरकार जागे झाले”, नेमकं काय घडलं ?
हेही वाचा…नवाब मलिक राष्ट्रवादीच्या ‘या’ गटात सहभागी? नवाब मलिक सभागृहात बसल्यानंतर मोठा गोंधळ
हेही वाचा…“SIT चौकशी होणार असल्याने आदूने प्रवासाची “दिशा” बदलून थेट दुबई गाठलीय”, शिंदे गटाने आदित्य ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…अजित पवार गटाच्या आमदारांना मिळणार मोठं गिप्ट, अधिवेशन संपताच होणार मंत्रिमंडळाचा विस्तार