पुणे : अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांचे अत्यंत विश्वासू, सुरूवातीला स्वीय सहाय्यक असलेले आणि विद्यमान सहकारमंत्री दिलीप वळसे पाटलांनीही शरद पवारांची साथ सोडली. आता दिलीप वळसे पाटलांना शह देण्यासाठी शरद पवारांनी देखील मोठी खेळी केली आहे. दिलीप वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक, विश्वासू, भीमाशंकर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी देऊन दिलीप वळसे पाटलांच्या अडचणीत वाढ केली आहे. त्यामुळे याची चर्चा आता राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे.
हेही वाचा…तिजोरीत पैसे नसल्याने ‘या’ जिल्ह्यातील ३२ शाळा बंद होण्याच्या मार्गावर, राष्ट्रवादीची सरकारवर टिका
शरद पवार यांनी देवदत्त निकम यांना राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्षपद सोपवलं आहे. यामुळे आंबेगावच्या राजकारणात याची जोरदार चर्चा सुरू आहे. आंबेगाव-शिरूरचे आमदार सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्यासोबत गेल्याने आंबेगावात शरद पवार गटाला मोठे खिंडार पडले आहेत. यातच आता दिलीप वळसे पाटलांना पर्याय म्हणून शरद पवारांनी वळसे पाटलांच्याच चेल्याला आपल्या गटात खेचून घेतले आहे.
हेही वाचा…भाऊ बहिणीच्या मदतीला धावणार, धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या भेटीला
दरम्यान, अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी मैदानात उतरून बंडखोरांच्या विरोधात डाव टाकण्यास सुरूवात केली आहे. यातच अलिकडेच शरद पवारांच्या सभा देखील झाल्या. दिलीप वळसे पाटील यांच्यापासून दूर झालेले देवदत्त निकम यांच्यावर शरद पवारांनी मोठी जबाबदारी सोपवली असल्याने आंबेगावच्या राजकारणाची धार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…हाय कोर्टाचा शिंदेंना मोठा दणका, घटनाबाह्य आदेश म्हणत कोर्टाचं मोठं निरिक्षण
हेही वाचा…त्या’ प्रकारावरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून फोन, मॅसेज, तृप्तीने मानले मनसैनिकांचे आभार
हेही वाचा…रोहित पवारांच्या दोन कंपन्या बंद होणार, १२ वाजता आली नोटीस, रोहित पवारांनी ‘या’ नेत्यांवर लावले आरोप
हेही वाचा…‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री,’ असं म्हटल्यानंतर पंकजा मुंडेंचं भाजपाकडून खच्चीकरण करण्यास सुरूवात
हेही वाचा…भाजपकडून लोकसभेची जंगी तयारी सुरू, अडीच लाख ग्रामपंचायतीमध्ये ‘ग्रामीण संवाद यात्रा’ काढणार