बीड : भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडे सातत्याने चर्चेत राहिल्या आहेत. यातत पंकजा मुंडे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला १९ कोटी रूपयांच्या जीएसटी थकबाकीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे. हा जीएसटी न भरल्यास कारखान्याची मालमत्ता जप्त करण्यात येणार असल्याचंही नोटीशीमध्ये उल्लेख केला आहे. साखर कारखान्यावर केलेले गैरव्यवहार फेटाळून लावत आपला कारखाना सध्या आर्थिक संकटातून जात असल्याचं मुंडेंनी सांगितलं आहे. त्यावर आता मंत्री धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या मदतीला धावून जाणार आहे.
हेही वाचा…शिंदे गट ठाकरेंच्या ‘या’ ४ खासदारांवर सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या तयारीत, कायदेशीर बाजू तपाण्यास सुरूवात
छत्रपती संभाजीनगरच्या जीएसटी आयुक्तांनी पंकजा मुंडे यांना वैद्यनात साखर कारखान्याचा १९ कोटींचा जीएसटी कर थकवल्याप्रकरणी वसुली आणि जप्तीची नोटीस पाठवली आहे. याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे पुढाकार घेणार आहेत. प्रशासकीय स्तरावर कारखान्यासाठी काय केलं पाहिजे. याबाबत मुंडे कारखान्याचे पदाधिकारी आणि पंकजा मुंडे याच्यांशी स्वत : आज किंवा उद्या चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…भाजपाच्या ‘आयत्या पिठावर’ राष्ट्रवादीच्या इच्छुक ‘नागोबांच्या रेघोट्या’, श्रेय घेण्यासाठी चढाओढ : पण, सत्ता असताना प्रश्न सोडवता आले नाही
दरम्यान, पंकजा मुंडे या कारखान्याबाबत पदाधिकाऱ्यांकडून काही चुकीची माहिती दिली जात असेल तर त्याबाबत योग्य माहिती दिली जाणार आहे. राज्य सरकार म्हणून काय केलं जायला पाहिजे. याबाबत धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांना मार्गदर्शन करणार आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“आंबेडकरांनी ४८ जागा लढविण्याच्या वल्गना करू नये,” रामदास आठवलेंनी वंचितसोबत दिले युतीचे संकेत
हेही वाचा…“हिवाळी अधिवेशनापुर्वी विरोधी पक्षनेता मंत्रिमंडळात दिसेल,” भाजप आमदाराचा मोठा दावा
हेही वाचा…“सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ?” महाराष्ट्राच्या अन्नदात्याला, विद्यादात्याला वाऱ्यावर सोडतात! ठाकरे गटाची टिका
हेही वाचा…अजित पवार गटाची जॅम्बो राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, ‘या’ बड्या नेत्यांचा कार्यकारिणीत समावेश
हेही वाचा…“हिंदुत्वाच्या गप्पा मारणारे भाजपावाले किती पाखंडी”, काॅंग्रेसकडून ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत साधला निशाणा