मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची जॅम्बो राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महासचिव आणि राष्ट्रीय प्रवक्ता ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाची कार्यकारिणी जाहीर केली आहे. यामध्ये अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल यांच्याही समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा…अजिदादांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगणार ? भाजप नेत्यांनी दिले ‘हे’ संकेत
राष्ट्रीय कार्यकारिणीत एकूण ३५ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यकारिणीत १४ सदस्य, १० स्थायी आमंत्रित आणि ११ विशेष आमंत्रित सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अध्यक्ष अजित पवार आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह सहा महासचिवांचा समावेश करण्यात आला आहे. खासदार सुनील तटकरे, बृजमोहन श्रीवास्तव, एस. आर. कोहली, के.के शर्मा. वाई.पी. त्रिवेदी, सैयद जलालुद्दीन वकिल आणि एन.ए मोहम्मद कुट्टी यांचा यामध्ये समावेश केला आहे. याशिवाय छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, कमलेश कुमार सिंह, वांथुंगो ओड्यू यांचा समावेश आहे.
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ खासदारांचे तिकीट कापणार, फडणवीस-शाह यांची बंद दाराआड चर्चा, नव्या उमेदवारांना संधी
तर स्थायी आमंत्रित सदस्यांमध्ये सदस्य माजी खा. मधुकर कुकरे, रामराजे निंबाळकर, धर्म राव आत्राम, धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर, संजय बानसोड, आदिती तटकरे, अनिल पाटिल, राजेंद्र जैन आणि विश्वजीत चंपावत. विशेष आमंत्रित सदस्य सच्चिदानंद सिंह, संजय कुमार सिंह, राजेंद्र शर्मा, शिवाजीराव गरजे, प्रताप चौधरी, पी.के.नरेश, अमिया सरकार, संजय प्रजापति, ओमिलो के. संगमा, सलाम जॉय सिंह आणि नवीन कुमार सिन्हा यांना घेण्यात आलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“हिंदुत्वाच्या गप्पा मारणारे भाजपावाले किती पाखंडी”, काॅंग्रेसकडून ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत साधला निशाणा
हेही वाचा…शिंदे गट ठाकरेंच्या ‘या’ ४ खासदारांवर सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या तयारीत, कायदेशीर बाजू तपाण्यास सुरूवात
हेही वाचा…भाजपाच्या ‘आयत्या पिठावर’ राष्ट्रवादीच्या इच्छुक ‘नागोबांच्या रेघोट्या’, श्रेय घेण्यासाठी चढाओढ : पण, सत्ता असताना प्रश्न सोडवता आले नाही
हेही वाचा…शिवसेना 16 अपात्र आमदार सुनावणीचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी लागणार निकाल
हेही वाचा…एकनाथ शिंदेंच्या सेनेत इनकमिंग सुरूच, ठाकरेंचे ‘तीन’ शिलेदार शिंदेंच्या सेनेत दाखल