मुंबई : मागील काही महिन्यापासून मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उडी मारून आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढलं आहे. अलिकडेच अप्पर वर्धा धरणगस्तांनी या जाळीवर उड्या मारल्या होत्या. याचबरोबर आता रखडलेली शिक्षक भरती लवकर सुरू व्हावी, कंत्राटी भरती प्रक्रिया रद्द व्हावी, या मागणीसाठी एका शिक्षकांनं मंत्रालयचाच्या संरक्षण जाळीवर उडी घेतली आहे. यावरून आता मंत्रालयात सुरक्षा वाढविण्यात आली आहे. या प्रकरणावरून ठाकरे गटाने राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…एकनाथ शिंदेंच्या सेनेत इनकमिंग सुरूच, ठाकरेंचे ‘तीन’ शिलेदार शिंदेंच्या सेनेत दाखल
ह्या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ? असा सवाल करत रखडलेली शिक्षक भरती लवकर सुरू व्हावी, कंत्राटी भरती प्रक्रिया रद्द व्हावी, ह्याकरिता आज एका शिक्षकानं मंत्रालयाच्या संरक्षण जाळीवर उडी घेतली. महिनाभरापूर्वी शेतकऱ्यांनी देखील असेच आपल्या मागण्यांसाठी संरक्षण जाळीवर उड्या मारल्या होत्या. शेतकरी असो व शिक्षक. आपल्या देशाचे, समाजाचे हे दोन आधारस्तंभ. ह्या मिंधे-भाजप सरकारचे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले जावे, ह्याकरिता या दोन्ही वर्गाला अशा प्रकारे आंदोलन करावे लागते, हेच खरे दुर्दैव आहे. ह्या सगळ्या खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीश्वरांची तळी उचलण्यात व्यस्त असतात, महाराष्ट्राच्या अन्नदात्याला, विद्यादात्याला वाऱ्यावर सोडतात! अशी टिका ठाकरे गटाने शिंदेंवर केली आहे.
हेही वाचा…अजिदादांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगणार ? भाजप नेत्यांनी दिले ‘हे’ संकेत
दरम्यान, मंत्रालयात आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढत असतांना आता सरकारने मंत्रालयाच्या मोकळ्या कॉरिडॉरमध्ये खिडक्यांमध्ये Steel Ropes लावण्याची कार्यवाही करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर मंत्रालय मुख्य इमारत व विस्तार इमारतीच्या टेरेसवर जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. कोणतीही अनधिकृत व्यक्तीला या ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे.
ह्या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?
रखडलेली शिक्षक भरती लवकर सुरू व्हावी, कंत्राटी भरती प्रक्रिया रद्द व्हावी, ह्याकरिता आज एका शिक्षकानं मंत्रालयाच्या संरक्षण जाळीवर उडी घेतली. महिनाभरापूर्वी शेतकऱ्यांनी देखील असेच आपल्या मागण्यांसाठी संरक्षण जाळीवर उड्या मारल्या होत्या. शेतकरी… pic.twitter.com/q4CSBFnydO
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) September 26, 2023
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवार गटाची जॅम्बो राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, ‘या’ बड्या नेत्यांचा कार्यकारिणीत समावेश
हेही वाचा…“हिंदुत्वाच्या गप्पा मारणारे भाजपावाले किती पाखंडी”, काॅंग्रेसकडून ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत साधला निशाणा
हेही वाचा…शिंदे गट ठाकरेंच्या ‘या’ ४ खासदारांवर सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या तयारीत, कायदेशीर बाजू तपाण्यास सुरूवात
हेही वाचा…भाजपाच्या ‘आयत्या पिठावर’ राष्ट्रवादीच्या इच्छुक ‘नागोबांच्या रेघोट्या’, श्रेय घेण्यासाठी चढाओढ : पण, सत्ता असताना प्रश्न सोडवता आले नाही
हेही वाचा…शिवसेना 16 अपात्र आमदार सुनावणीचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी लागणार निकाल