मुंबई : महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुरूवातीला अजित पवार राज्याचे विरोधी पक्षनेते बनले. त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड पुकारत महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. याआधी विरोधी पक्ष नेते म्हणून असलेले राधाकृष्ण विखे पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश करीत मंत्रीपदाची शपथ घेतली. यातच आता दिवाळीपर्यत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आमच्या मंत्रिमंडळात दिसतील, असा दावा भाजप नेते नितेश राणे यांनी दिला आहे.
हेही वाचा…शिवसेना 16 अपात्र आमदार सुनावणीचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी लागणार निकाल
भाजप नेते नितेश राणे वारंवार महाविकास आघाडीवर टिका करतांना दिसत आहे. यावेळी येणाऱ्या हिवाळी अधिवेशनापर्यंत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर लक्ष ठेऊन रहा. कारण विजय वडेट्टीवार हिवाळी अधिवेशनापुर्वी महायुतीत मंत्री झालेले दिसतील. असा नितेश राणे यांनी दावा केला आहे. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी नितेश राणे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…एकनाथ शिंदेंच्या सेनेत इनकमिंग सुरूच, ठाकरेंचे ‘तीन’ शिलेदार शिंदेंच्या सेनेत दाखल
दरम्यान, नारायण राणे यांच्यासोबत काॅंग्रेससोबत होतो. त्यावेळी नारायण राणे यांची भूमिका वेगळी होती. त्यावेळेसच मी काॅंग्रेसमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्यांच्या मंत्री होण्याच्या वावड्या उठवून राणें पहिल्यांदा मंत्री व्हावं. दुसऱ्यांची बदनामी करून सुरू आहे. नितेश राणे यांच्या भिकारचोट आव्हानाला कोणताही प्रतिसाद देणार नाही. असं वडेट्टीवारांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ?” महाराष्ट्राच्या अन्नदात्याला, विद्यादात्याला वाऱ्यावर सोडतात! ठाकरे गटाची टिका
हेही वाचा…अजित पवार गटाची जॅम्बो राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, ‘या’ बड्या नेत्यांचा कार्यकारिणीत समावेश
हेही वाचा…“हिंदुत्वाच्या गप्पा मारणारे भाजपावाले किती पाखंडी”, काॅंग्रेसकडून ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत साधला निशाणा
हेही वाचा…शिंदे गट ठाकरेंच्या ‘या’ ४ खासदारांवर सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या तयारीत, कायदेशीर बाजू तपाण्यास सुरूवात
हेही वाचा…भाजपाच्या ‘आयत्या पिठावर’ राष्ट्रवादीच्या इच्छुक ‘नागोबांच्या रेघोट्या’, श्रेय घेण्यासाठी चढाओढ : पण, सत्ता असताना प्रश्न सोडवता आले नाही