मुंबई : मराठी माणसाला घर देणार नाही म्हणत मुलुंडमध्ये तुप्ती देवरूखकर यांना व त्यांच्या पतीला धक्काबुक्की करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तुप्ती यांनी यानंतर सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत राजकीय पक्षांनी मराठीच्या नावावर राजकारण करणे बंद करावे, शिवाजी महाराजांचे नावही घ्याचे बंद करावे असे म्हणत संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर मनसे आक्रमक होत संबंधित व्यक्तीला समज देऊन त्यांनी झालेल्या प्रकारची माफि मागितली. यानंतर तुप्तीनी मनसेचे आभार मानले. तर महिला आयोगाने देखील या प्रकरणासंदर्भात चौकशी करण्याची मागणी केली होती.
हेही वाचा…“आंबेडकरांनी ४८ जागा लढविण्याच्या वल्गना करू नये,” रामदास आठवलेंनी वंचितसोबत दिले युतीचे संकेत
मनसेने केलेल्या ट्विटमध्ये असं म्हटलंय की, तृप्ती देवरुखकर ह्या मराठी भगिनीला आलेल्या अनुभवातून किमान आता तरी काही महाभागांना कळलं असेल कि महाराष्ट्राच्याच राजधानी मुंबईत मराठी मनं किती अस्वस्थ आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जेव्हा मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी कोणताही लढा उभा करते तेव्हा राष्ट्रीय प्रवाहात आमचं ‘देश तोडणारे खलनायक’ म्हणून चित्रं उभं केलं जातं आणि आपलेच मराठी जाणते मान्यवर आम्हाला संकुचित ठरवून मोकळे होतात. आज तृप्ती देवरुखकर ह्यांना आलेल्या अनुभवानंतर तत्परतेने महाराष्ट्र नवनिर्माण सेना मदतीला धावून गेली. त्या माणसाला जाहीर माफी मागायला लावली. पण हे प्रातिनिधिक उदाहरण आहे, पण हिणवणं, तुच्छ लेखणं, तुसडेपणाने वागवणं हे मराठी माणूस रोज मुंबईच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात अनुभवत असतो पण मुंबई-महाराष्ट्रावर इतकी वर्ष राज्य करूनही कोणताही राज्यकर्ता इतरांची मतं जातात म्हणून ह्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. मराठी जनांनी हे लक्षात घ्यायला हवे.
हेही वाचा…“हिवाळी अधिवेशनापुर्वी विरोधी पक्षनेता मंत्रिमंडळात दिसेल,” भाजप आमदाराचा मोठा दावा
महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या की, तृप्ती देवरुखकर यांना मराठी भाषिक असल्याच्या कारणावरून मुलुंड, मुंबई येथील शिवसदन सहकारी गृहनिर्माण संस्थेने सदनिका नाकारण्यात आली तसेच याबाबत प्रश्न उपस्थित केल्याने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचे वृत्त मध्यामांवरून प्रसारित होत आहे. भारतीय राज्य घटनेचे अनुच्छेद 15 अन्वये धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान या आधारावर कोणत्याही नागरिकासोबत भेदभाव करता येणार नाही अशी तरदुत करण्यात आली आहे. यामध्ये जात आणि भाषा अनुस्युत आहेत. तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मध्ये सुद्धा विशिष्ट जाती, धर्म, भाषा यांना गृहनिर्माण संस्थेत घर देऊ नये अशी कोणतीही मुभा संस्थेला देण्यात आलेली नाही. असे असतानाही बहुतांश सहकारी गृहनिर्माण संस्था विशिष्ट जाती, धर्म, भाषा आणि आहार पद्धती या आधारावर उघडपणे भेदभाव करत आहेत.
हेही वाचा…अजित पवार गटाची जॅम्बो राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, ‘या’ बड्या नेत्यांचा कार्यकारिणीत समावेश
गृह योजनांच्या जाहिराती आणि वेबसाईटवरही फक्त ‘ गेटेड कम्युनिटी ‘ साठी असे ठळकपणे लिहिलेले असते. याबाबत सहकार विभाग आणि गृहनिर्माण विभाग यांनी गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाही करणे गरजेचे आहे. भाषावार राज्य निर्मितीच्या आधारावर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला आहे. असे असले तरी, महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत मराठी भाषिक महिलेला सदनिका नाकारली जाते, ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे ह्या घटनेची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली असून याप्रकरणी सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांना चौकशी करून अहवाल मागविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे याप्रकरणी संबंधित महिलेला भाषेच्या आधारे दुय्यम वागणूक देऊन मारहाण करण्यात आल्याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित पोलीस ठाणे यांना देण्यात आले आहेत.
तृप्ती देवरुखकर ह्या मराठी भगिनीला आलेल्या अनुभवातून किमान आता तरी काही महाभागांना कळलं असेल कि महाराष्ट्राच्याच राजधानी मुंबईत मराठी मनं किती अस्वस्थ आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जेव्हा मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी कोणताही लढा उभा करते तेव्हा राष्ट्रीय प्रवाहात आमचं ‘देश… pic.twitter.com/iXJOi9GlWC
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 27, 2023
READ ALSO :
हेही वाचा…रोहित पवारांच्या दोन कंपन्या बंद होणार, १२ वाजता आली नोटीस, रोहित पवारांनी ‘या’ नेत्यांवर लावले आरोप
हेही वाचा…‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री,’ असं म्हटल्यानंतर पंकजा मुंडेंचं भाजपाकडून खच्चीकरण करण्यास सुरूवात
भाजपकडून लोकसभेची जंगी तयारी सुरू, अडीच लाख ग्रामपंचायतीमध्ये ‘ग्रामीण संवाद यात्रा’ काढणार
हेही वाचा…तिजोरीत पैसे नसल्याने ‘या’ जिल्ह्यातील ३२ शाळा बंद होण्याच्या मार्गावर, राष्ट्रवादीची सरकारवर टिका
हेही वाचा…भाऊ बहिणीच्या मदतीला धावणार, धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या भेटीला