मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकांचा सपाटा लावला आहे. आज झालेल्या बैठकीत कोल्हापूर, हातकणंगले,रावेर, बारामती, शिरूर, सातारा, माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला आहे.
हेही वाचा…“ससून मधून पळून गेलो नाही, मला पळवलं गेलं, सर्व सांगणार,” अटक केल्यानंतर ललित पाटलाचा व्हिडीओ व्हायरल
राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर बारामती, आणि शिरूर मतदारसंघात उमेदवार देणार असल्याच्या अजित पवार गटाकडून प्रयत्न केले जात आहेत. विद्यामान खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आलीय. तसेच इतर लोकसभा मतदारसंघाचाही आढावा घेण्यात आला.
हेही वाचा…लोकसभेच्या ४८ पैकी २२ जागांवर शिंदे गटाचा दावा, मग अजित पवार गटाला किती जागा मिळणार ?
सध्या कोल्हापुर लोकसभेत शिवसेनेचे संजय महाडिक खासदार आहेत. तर रावेरमध्ये भाजपच्या खासदार रक्षा खडसे, सातारा लोकसभेमधून श्रीनिवास पाटील तर माढा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे रणजित नाईक निंबाळकर सध्या खासदार आहेत. या जागांसाठी आता शरद पवार गट आग्रही असून उमेदवार निवडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…दिल्लीत अजितदादांची एन्ट्री, होम हवन करत नव्या कार्यालयाचं उद्घाटन, राष्ट्रवादीचं दोन कार्यालय
हेही वाचा…ललित पाटीलने सर्व आरोप फेटाळले, कोर्टात नेमकं काय काय घडलं ?
हेही वाचा…ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात फडणवीसांचाही संबंध ? दादा भुसेंनंतर सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप
हेही वाचा…“ललित पाटीलला भरचौकात फाशी द्या,” कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकरांनी केली मागणी
हेही वाचा…जरांगेंच्या अल्टिमेटला सहा दिवस बाकी, उपसमितीच्या बैठकीत मराठा समाजासाठी घोषणांची बरसात