मुंबई : निवडणुक आयोगाने राष्ट्रवादी पक्षनाव आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. मुळ पक्ष म्हणून अजित पवार यांच्या गटाला मान्यता मिळाल्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य कार्यालय आणि पक्ष निधीवर देखील अजित पवार गटाकडून दावा सांगण्यात येणार अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे पक्षनाव आणि चिन्ह गेल्यानंतर आता पक्षाचा निधीही जाणार का ? अशी चर्चा आता सगळीकडे सुरू झाली आहे.
हेही वाचा…राज्यसभेवर भाजपकडून कोण ? वरिष्ठ पातळीवर महाराष्ट्रातून पाठविली ‘ही’ डझनभर नावं
केंद्रीय निवडणुक आयोगाने अजित पवार गटच मुळ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष असल्याचा निकाल दिला. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई येथील मुख्यालय तसेच पक्ष निधीबाबत अजित पवार काय निर्णय घेणार ? त्याकडे सगळ्याचे लक्ष आहे. मात्र सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पक्षाचे मुंबईतील बॅलर्ड इस्टेट येथील प्रदेश कार्याल तसेच पक्षाच्या निधीवर अजित पवार गट दावा सांगणार नाही. त्यामुळे हे पक्ष कार्यालय आणि पक्ष निधी शरद पवार गटाकडेच राहणार असून त्यावरून भविष्यात वाद होण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा…बारामतीत सुप्रियाताई सुळे विरुद्ध सुनेत्राताई पवार? भाजपच्या हायकमांडने अजित पवारांना दिल आदेश
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नरिमन पॉईंट येथील मुळ जागेवर पुन्हा कार्यालय बांधल्यानंतर त्या ठिकाणी अजित पवार गटालाच कार्यालय मिळू शकते. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुत्रांनुसार नव्या जागेत होणारे कार्यालय हे कॉर्पोरेट कार्यालयांसोबत असणार आहे. त्यामुळे त्याठिकाण कार्यकर्त्यांना येणे-जाणे सुलभ होणार नाही. त्यामुळे त्या कार्यालायवार दावा सांगण्याऐवजी नवीन जागेत कार्यालय मिळावे, असा पक्षाचा प्रयत्न असणार असल्याची माहिती समोर येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“राज्यात सध्या पुतण्यांचे दिवस..!” राज्यात आणखी एका ‘काका पुतण्यात’ रंगलं राजकारण
हेही वाचा…कॉंग्रेससोबतचा 48 वर्षाचा प्रवास संपुष्टात..! मुंबईतील कॉंग्रेसचे ‘मास लीडर’ म्हणून ओळख, कोण आहेत बाबा सिद्दीकी ?
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे उतरले मैदानात , कोकण दौऱ्यानंतर आता मुंबई अन् त्यानंतर मराठवाडा
हेही वाचा….“कार्यालयातून घड्याळ चिन्ह काढतांना पवार साहेबांच्या निष्ठावान कार्यकर्त्याच्या डोळ्यात आलं पाणी”, व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…कॉंग्रेसला मोठा झटका..! कॉंग्रेससोबत असलेला 48 वर्षाचा प्रवास ‘या’ नेत्याने संपवला, अजित पवार गटात करणार प्रवेश ?