मुंबई : शिवसेनेच्या भायखळ्याच्या आमदार यामिनी यशवंत जाधव अडचणीत आल्या आहेत. आयकर विभागाने त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी आपल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीविषयी चुकीची माहिती दिल्याचा ठपका देऊन आयकर विभागाने त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप, SIT नोंदवणार आमदार संजय राठोड यांचा जबाब
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी यामिनी जाधव यांनी आपल्या संपत्तीबाबत चुकीची माहिती दिल्याचं आयकर विभागाचं म्हणणं आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्राची तपासणी केली असता, ही बाब उघड झाल्याचंही आयकर विभागाने सांगितलं आहे. त्यामुळे आयकर विभागाने यामिनी जाधव यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी आयकर विभागाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. २०१९ च्या निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात यामिनी जाधव यांनी आपल्याकडे ७.५ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं नमूद केलं होतं. यामध्ये २.७४ कोटींची जंगम मालमत्ता असल्याचं नमूद केलं होतं. तर पती यशवंत जाधव यांच्या नावावर ४.५९ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं नमूद केलं होतं. यामध्ये १.७२ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
न्यायालयच्या दणक्यानंतर अनिल देशमुखांना ईडीचे पाचव्यांदा समन्स!
यामिनी जाधव भायखळा विधानसभआ मदतारसंघाच्या आमदार आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी एमआयएमच्या वारीस पठाण यांचा पराभव केला होता. प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
Read Also :
- “आपला अनुभव किती, राजकीय कारकीर्द काय?, रुपालीताई तुमची राजकीय शूर्पणखा होऊ देऊ नका!”
- “बाळासाहेबांशी बेईमानी करणाऱ्या घरफोड्या शिवसैनिकाला स्मृतीस्थळाची भेट घेऊ देणार नाही!”
- राज्य भाजप नेत्यांवर पंकजा मुंडे अजूनही नाराज? रावसाहेब दानवेंचा मोठा खुलासा!
- शिवसेनेला महाराष्ट्रातून संपविल्याशिवाय राहणार नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य
- फरार गजानन काळेंना लवकरात लवकर अटक व्हावी, संजीवनी काळे यांचे केंद्रीय मंत्र्याना साकडे