मुंबई : माजी मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ रामदास कदम यांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे जुने विरुद्ध नवीन शिवसेना असा वाद पुन्हा रंगला आहे. या वादावर मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व प्रकरणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलेच संतापले असून, रामदास भाईंवर पक्षांतंर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्या कथित ऑडिओ क्लिपची शहानिशा करून रामदास कदम यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.
अभ्यास नको, गप्पा मारा; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची वर्गात जाऊन भन्नाट सुरूवात
रामदास कदम हे शिवसेचे ज्येष्ठ नेते असून, माजी मंत्री देखील राहिले आहेत. त्यांची अशा प्रकारे कथित ऑडिओ क्लिप बाहेर येणे योग्य नसल्याची भावना काही शिवसेनेच्या नेत्यांची आहे. त्यामुळे जर आता रामदास कदम यांच्यावर कारवाई केली तर पक्षात यापुढे असे कृत्य करणाऱ्यांवर जरब बसेल असे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे. याचमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रामदास कदम यांच्यावर कारवाई करण्याची दाट शक्यता आहे. रामदास कदमांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे पक्ष बदनाम होत असल्याची भावना देखील शिवसेनेच्या काही नेत्यांची आहे.
ठाकरे सरकारच्या ३ सदस्यीय प्रभागरचनेला ग्रहण; मनसे न्यायालयात सोमवारी याचिका दाखल करणार
नुकतीच रामदास कदम यांची कथित ऑडिओ क्लिप समोर आली होती. त्याआधी कोकणातील अनंत गीते यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत महाविकास आघाडीत दुफळी निर्माण केली होती. याचमुळे या दोन्ही नेत्यांवर सध्या शिवसेनेत नाराजी आहे. बाळासाहेबांच्या काळातले हे शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये अडचण निर्माण करत आहेत?एवढी मंत्री पदे मिळूनही माजी मंत्री पक्षाला बदनाम का करत आहेत? असा सवाल आता काही शिवसैनिक विचारू लागले आहेत.
Read Also :
- …तोपर्यंत ठाकरे सरकारला जगू देणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा इशारा
- धनसंपदा विरुद्ध सामान्य कार्यकर्ता अशा लढाईत भाजपचा विजय निश्चित – सुभाष साबणे
- प्रियंका गांधींना भाजप घाबरते, पोलिसांनी त्यांना तात्काळ सोडाव, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर…?
- कार्यकर्त्यांनी पोलिसांची गाडी पेटवली; प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
- शाळेचं नाही तर आपल्या भविष्याचं दार उघडलं; उद्धव ठाकरेंचा विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद