मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी शिवसेनेविरोधात बंड पुकारला होता. त्यावेळी सुरत, गुवाहाटीवरून माघारी परतलेले शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख सध्या चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसत आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत माझ्याकडे अनेक पुरावे असल्याचं म्हटलं आहे. तसेच योग्य वेळ आली तर मी सर्व पुरावे बाहेर काढणार असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
“शिवाजी पार्क सील केलं तर ते तोडून टाकू;” परवानगी नाकारल्याने चंद्रकांत खैरे आक्रमक
काही दिवसांपुर्वी लाचलुचपत विभागामार्फत चौकशी झाल्याचं नितीन देशमुखांनी म्हटलं आहे. खरंतर माझी इडीकडून चौकशी करायला हवी होती. ईडीकडून चौकशी झाली असती तर समाजात माझा मान वाढला असता अशी खोचक टिप्पणी देखील त्यांनी केली आहे. माझ्याविरोधात जर कारवाई केली तर माझ्याकडे अनेक व्हिडीओ तयार आहेत. ते मी उघड करेन. 50 खोके ओकेचं षडयंत्र गेल्या दीड वर्षापासून सुरू होतं. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचे, सत्तांतर घडवणाऱ्यांचे माझ्याकडे व्हिडीओ आहेत. हे सत्तांतर पैशांच्या माध्यमातून झाले आहे हे मी सिद्ध करेन. जर मी हे सिद्ध करू शकलो नाही. तर मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करेन असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संक्रात..! रूपाली पाटील म्हणाल्या, “कुठे आहे रे कडकनाथा?”
नितीन देशमुख यांच्या इशाऱ्यानंतर भाजप नेते नितेश राणेंनी त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले की, चेहरा बघून दोन-तीन महिने अगोदरच गेला आहेस असा चेहरा आहे. हे चिंधीचोर महाराष्ट्राच्या विधिमंडळाला आत्महत्या करायचं केंद्र समजतात की काय. शेण खायचे आहे तर बाहेर खा पण विधिमंडळाचा अपमान कशाला? असा खोचक टोला हाणला आहे.
Read also
- “तिघाडी सरकारचा पुण्यात सुफडा साफ झाला..! तीन तिघाडा, काम बिघाडा”; रूपाली पाटील
- राऊतांचा खासदार म्हणून महिन्याला 1 लाख 85 हजार अन् सामनात 1 लाख पगार..! इडीने जाहीर केलं राऊतांचं आरोपपत्र
- “दसरा मेळाव्याची स्क्रिप्ट बारामतीवरून येणार, अबु आझमी व ओवेसी स्टेजवर असणार का?” मनसेचा खोचक सवाल
- “आज रामदास कदमांचं खरं रूप समोर आलं, उद्या सगळ्याच बंडखोर आमदारांचं रूप समोर येईल”
- “राहुल गांधींनाच काॅंग्रेसचा अध्यक्ष बनवा”; महाराष्ट्र काँग्रेसच्या बैठकीत ठराव मंजूर