पुणे : शिवसेनेचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची सभा अलिकडेच कोकणात झाली. त्या सभेत त्यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांचा उल्लेख गद्दार म्हणून केला. यालाच प्रत्युत्तर म्हणून बंडखोर आमदार रामदास कदम यांनी देखील दापोलीमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत रामदास कदमांनी उद्धव ठाकरे, अन् आदित्य ठाकरेंवर प्रत्यक्षपणे टिका करताना त्यांनी खालच्या शब्दांचा वापर केला. यामुळे राज्यातील राजकीय नेत्यांनी त्यांना आता धारेवर धरलं आहे.
“सोमय्यांच्या आरोपांची तार आज छेडली, कशी नशिबाने थट्टा आज मांडली”
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात 40 आमदारांसह बंड पुकारला. त्यानंतर त्यांच्यावर शिवसैनिकांकडूून प्रत्यक्षपणे शाब्दिक हल्ले सुरू झाले. यामध्ये उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरे बंडखोरांचा उल्लेख गद्दार म्हणून करू लागले. परंतु बाळासाहेबांच्या विचारांपोटी आम्ही उद्धव ठाकरे यांच्यावर कोणतीही टिका टिप्पणी करणार नाही. अशी भूमिका सुरूवातीला बंडखोर आमदारांनी घेतली. परंतु आता बंडखोर आमदार उघड उघड पणे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना दिसत आहेत.
“रामदास कदमांना तात्काळ वेड्यांच्या रूग्णालयात दाखल करा”; भास्कर जाधवांनी कदमांना फटकारलं
दापोलीत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करीत अगदी खालच्या पातळीवर जाऊन टिका केली. बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरे यांनी मला मारण्याचा कार्यक्रम हाती घेतला असं देखील रामदास कदम यांनी म्हटलं. त्यानंतर त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे तसेच शिवसेनेतील माझी जागा घेतल्याचा आरोप केला. त्यावर शिवसेनेकडून रामदास कदम यांचे जूने व्हिडीओ ट्विट करत रामदास कदमांना शिवसेनेने आतापर्यंत काय काय दिले याचे पुरावे दिलेत. त्यानंतर रामदास कदम आणि शिवसेनेत जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत.
“संजय राऊतांना सुटका नाहीच”; राऊतांचा तुरूंगातील मुक्काम आणखी वाढला
दरम्यान, राज्यात बंडखोर आमदार आणि शिवसेनेत जोरदार राजकीय वाद सुरू असताना त्यात आता राष्ट्रवादीने देखील उडी घेतली आहे. राष्ट्रवादीचे पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. वाघाचं कातडं पांघरून काही लांडगे शिवसेनेत मिरवत होते. हळू हळू त्यांचं खरं रूप समोर येत आहे. आज रामदास कदमाचं खरं रूप समोर आलं आहे. उद्या सगळ्याचं बंडखोर आमदारांचं रूप समोर येईल असं प्रशांत जगताप यांनी टोला हाणला आहे.
Read also
- “राहुल गांधींनाच काॅंग्रेसचा अध्यक्ष बनवा”; महाराष्ट्र काँग्रेसच्या बैठकीत ठराव मंजूर
- “शिवाजी पार्क सील केलं तर ते तोडून टाकू;” परवानगी नाकारल्याने चंद्रकांत खैरे आक्रमक
- एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संक्रात..! रूपाली पाटील म्हणाल्या, “कुठे आहे रे कडकनाथा?”
- “बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर मला संपवण्याचा कार्यक्रम उद्धव ठाकरेंनी हाती घेतला”; रामदास कदम
- ‘अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है,