मुंबई : संजय राऊतांमुळे शिवसेना फुटली असल्याचा आरोप बंडखोर आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री असेलेले शंभुराजे देसाई यांनी केला आहे. तसेच शरद पवारांचं वक्तव्य कधीही खरं ठरत नाही असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर देखील निशाणा साधला. 50 कोटी रुपये दिल्याचा पुरावा दिल्यास राजकारण सोडून देईन, असंही त्यांनी म्हटलं आहे. ते काल साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.
“देवेंद्रजी रात्री वेश बदलून एकनाथ शिंदें भेटायला जायचे”; अमृता फडणवीसांचं गौप्यस्फोट
संजय राऊतांमुळेच शिवसेना फुटली, त्यामुळे त्यांना महत्व देत नाही. शरद पवार जे बोलतात ते कधीच खरं ठरत नाही. त्यांनी महाविकास आघाडी सरकार 25 वर्ष टिकेल असं सांगितलं होतं. पण अडीच वर्षात हे सरकार गेलं. आता शरद पवार म्हणत आहेत मध्यवर्ती निवडणुका लागणार पण तसं होणार नाही. ते बोलतात त्यांच्या उलट घडतात असंही देखील शंभुराजे यांनी म्हटलं आहे.
“विश्वप्रवक्ते पक्ष सोडून जाणाऱ्या खासदारांसाठी कोणत्या नवीन शब्दांचा वापर करायचा”; मनसेचा सवाल
मैदान आता जास्त दुर नाही. अडीच वर्षानंतर निवडणुका होतील. तेव्हा परिस्थिती समोर येईल. आमच्या नेत्याने एकाही आमदाराला पराभूत होऊ देणार नाही. असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. त्यामुळे आमचा सर्वांचा त्यांच्यावर विश्वास आहे. तसेच त्यांच्यावर 50 कोटी घेतल्याचा आरोप होत आहे. याबाबत विचारले असता ते म्हणाले की, जर तुम्ही आम्हाला 50 कोटी रूपये घेतल्याचा पुरावा दिल्यास राजकारण सोडून घरी बसेन. आम्ही शिवसेनेत आहोत. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंची शिवसेना पुढे घेऊन आम्ही चाललो आहोत. असंही देखील ते म्हणाले.
“काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, रिक्षाला ब्रेकच लागत नव्हता”
दरम्यान, एकनाथ शिंदे साहेब आदरणीय आहेत पण शिवसेनेच्या आमदारांना ढाल समजून किरीट सोमय्या आणि दोन भाजपचे अन्य दोन वाचाळविर उद्धव ठाकरे व शिवसेनेवर टिका करतील. तर त्यांना एवढच सांगणे आहे की आमच्यातील शिवसेना आजही जिवंत आहे. उगाच कळ काढू नका. शिंदे साहेबांनी भाजपवर दाखवलेल्या विश्वासाला तडा देऊ नका, भाजपा आमची शत्रू नाही आणि त्यांच्या विरोधात आम्हाला बोलण्यास आनंदही नाही. परंतु वाचाळविरांना माफी मिळणार नाही. भविष्यात काय होईल माहिती नाही पण भाजपाने याची दखल घेणे गरजेचे आहे. असं शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.
Read also
- “शिंदे साहेबांनी भाजपवर दाखवलेल्या विश्वासाला तडा देऊ नका, भाजपा आमची शत्रू नाही”
- “कारण रिक्षाला बुलडोझरनेच ओढलं जातंय”; ‘त्या’ वक्तव्यावरून राष्ट्रवादीचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला
- “अफवांवर विश्वास ठेऊ नका”; शरद पवारांसोबत व्हायरल झालेल्या फोटोचं शिंदेंकडून खंडण
- “ये आमच्याकडे बोकड कसं वरपायचं, कोंबडी कशी तोडायची शिकवतो”
- “भाजपच्या ‘त्या’ उमेदवाराला पाठिंबा द्या”, सेनेच्या खासदाराचं उद्धव ठाकरेंना पत्र, अडचणी वाढल्या