मुंबई : महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा असताना अशातच अजून एक धक्का महाविकास आघाडीला बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकावर आज ईडीने कारवाई केली आहे. ईडीने उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याची 6 कोटीपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता जप्त केली आहे. त्यावर किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधताना म्हटलं आहे की, घोटोळेबाजांना सोडणार नाही.
ईडीने आज पुष्पक बुलियन प्रकरणात ठाण्यातील प्रकल्पातील 11 सदनिकावर कारवाई केली आहे. उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालिकीच्या या सदनिका असल्याचं सांगण्यात येत आहे. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरे यांचे भाऊ आणि उद्धव ठाकरे यांचे मेहुणे होत. याअगोदर देखील मनी लॉण्डिंगप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच माहितीच्या आधारे त्यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे.
शिवसेनेनं मावळची जागा पार्थ पवारांसाठी सोडावी; संजय राऊतांनी स्पष्टचं केलं
कर्जत येथील वैजनाथ देवस्थान येथील जमीनाचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्यांनी केला होता. वैजनाथ येथील शंकराचे देवस्थान असून त्याठिकाणी हा प्रकार झाल्याचा आरोप होता. त्यात एका सलीम नावाच्या व्यक्तीच्या नावावर ती जमीन केली होती. त्यानंतर ती जमीन श्रीधर पाटणकर यांच्यानावे केला असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.
13 सहकारी कारखाने पवार कुटुंबीयांनी हटप केले; लिलाव काढून 400 कोटी कारखाना 10 कोटीला
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप संजय राऊत भाजपवर करत आहेत. तसेच संजय राऊत यांनी देखील इडीच्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं चिघळलं होतं.
Read also:
- उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई; 6 कोटीपेक्षा अधिक संपत्ती जप्त
- तुम्ही सगळे श्रेय घ्या, पण एसटीचा संप मिटवा; चंद्रकांत पाटलांचं राज्य सरकारला आवाहन
- उच्च न्यायालयाकडून नारायण राणेंना अधिश बंगल्याप्रकरणी दिलासा ; नितेश राणेंचा सेनेला ‘हा’ गंभीर इशारा
- ”ज्यावेळी माझ्याकडून जिल्ह्याची बदनामी होईल, त्या दिवशी शेवटचा श्वास ”; मुंडे भाऊबहिण आमनेसामने
- RSS च्या मुस्लिम शाखा उघडणाऱ्या सरसंघचालकांना फडणवीस ‘जनाब’ म्हणणार का?