बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वाद सगळ्यांनाच माहिती आहे. यांच्यात दोन्ही नेते अनेकदा एकमेकांवर टिकाटिप्पणी करताना दिसतात. शेतकरी मेळाव्यात बोलतांना बीड जिल्ह्यातील विविध घटनांवरून यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
आपची राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर ; मात्र मराठी अभिनेता संदीप पाठकची प्रतिक्रिया व्हायरल
त्या पुढे म्हणाल्या की, राज्याच्या राजकारणामध्ये आज चालु असलेली सर्कस सुरू आहे. त्या सर्कशीत आपण नाहीत,. ती बाहेरून पाहायला बरी वाटतेय, ज्या दिवशी माझ्याकडून जिल्ह्याची बदनामी होईल, त्या दिवशी शेवटचा श्वास असणार आहे. स्वर्गातही गोपीनाथ मुंडे यांची मान खाली जाणार नाही. अशा पद्धतीने वागत आहे, असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
सोलापुरात सचिन वाझे पॅटर्न स्टिंग ऑपरेशनमुळे महाविकास आघाडीला दुसरा धक्का
बीडमध्ये काय अवस्था झाली आहे, हे सांगण्याची गरज नाही. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने स्वत: लक्षवेधी टाकली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, बीडचा बिहार झाला आहे. त्यामुळे मी सुद्धा वेळोवेळी सांगत होते. बीडमध्ये माफियाराज आहे, वाळू माफिया आहे. पोलिसांकडे प्रत्येक तक्रार दाखल करण्यासाठी राजकीय हस्तक्षेप होत आहे. तर एसीपीना रजेवर पाठवून नवीन एसपी देण्याची मागणी यातच सर्व काही आलं असल्याचा टोला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर लगावला.
“कोल्हापूर उत्तरेत महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्याची जबाबदारी क्षीरसागरांवर “; ठाकरेंचे आदेश
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. बीड जिल्ह्यातील विविध घडामोडींबाबत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे नेहमी भाष्य करत एकमेकांवर टीका करीत आहेत.
Read also:
- RSS च्या मुस्लिम शाखा उघडणाऱ्या सरसंघचालकांना फडणवीस ‘जनाब’ म्हणणार का?
- ”..तर मी त्यांच्याशिवाय आघाडीत राहीन ”; स्वाभिमानी संघटनेच्या एकमेव आमदारांचा राजू शेट्टींना घरचा आहेर
- शिवसेनेनं मावळची जागा पार्थ पवारांसाठी सोडावी; संजय राऊतांनी स्पष्टचं केलं
- 13 सहकारी कारखाने पवार कुटुंबीयांनी हटप केले; लिलाव काढून 400 कोटी कारखाना 10 कोटीला
- मी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असल्याने माझा छळ; एकनाथ खडसेंचे फडणवीसांवर गंभीर आरोप