पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अभियांत्रिकी सेवेची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखत न झाल्यानं नोकरी न मिळाल्याने आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर याच्या कुटुंबीयांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. सुप्रिया सुळे यांनी स्वप्नीलच्या कुटुंबीयांचं सांत्वन करत त्याच्या बहिणीच्या शिक्षण आणि नोकरीची हमी घेतली. स्वप्नील लोणकर याची आई यावेळी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
“…तर राज्य सरकार विरोधात पुन्हा तीव्र मूक आंदोलन सुरु करावे लागले”
स्वप्निल लोणकर यानं २९ जून रोजी पुण्यात आत्महत्या केली होती. त्यानंतर या घटनेचे पडसाद पावसाळी अधिवेशनात दिसून आले. भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MPSC परीक्षेच्या मुद्यावरून ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आज बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या दौंड तालुक्यातील केडगाव या ठिकाणी स्वप्निलच्या आई वडिलांची भेट घेतली. दरम्यान, मनसेचे अमित ठाकरे यांनी काही दिवसांपुर्वी स्वप्निलच्या कुटूंबीयांची भेट घेतली होती.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणारे उमेदवार स्व. स्वप्नील लोणकर यांच्या केडगाव,ता.दौंड येथील घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. आम्ही सर्वजण लोणकर कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. स्वप्नील यांना भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/3BOqg7I9L2
— Supriya Sule (@supriya_sule) July 10, 2021
सुप्रिया सुळेंनी लोणकर कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी स्वप्निलच्या आई भावुक झाल्या. आठ दिवसांपूर्वी निर्णय झाला असता तर माझा मुलगा वाचला असता, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. माझ्या मुलाने अनेकांना प्लाझमा दिला. अनेकांचे जीव त्यानं वाचविले मात्र तो वाचू शकला नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली. स्वप्नीलच्या कुटुंबाचे सांत्वन करताना सुळे यांनी स्वप्निलच्या कुटुंबाचे सर्वस्वी जबाबदारी घेण्याची हमी दिली. स्वप्निलच्या बहिणीला एक मोबाईल देखील भेट देण्यात आला. सुप्रिया सुळेंनी यावेळी स्वप्नीलच्या कुटुंबावर असलेल्या कर्जाची माहिती घेऊन पूर्ण निपटारा करण्याचे आदेश दिले आहेत.
कोल्हापूर जिल्हा परिषद: युवराज पाटलांना दिलेला शब्द पाळणार का मंत्री हसन मुश्रीफ?
खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी माध्यामांशी बोलताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांनी कोणताही वेगळा निर्णय घेऊ नये, सरकरार त्यांच्या पाठिशी असून चर्चा केली तर मार्ग करु शकतो. खासदार म्हणून मी तुमच्या सोबत चर्चा करायला तयार आहे. पण विद्यार्थ्यांनी कसलाही वेगळा विचार करु नये, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केला.
Read Also :
- “मी ईडीला भीक घालत नाही”, भास्कर जाधवांनी फोडली डरकाळी
- “…तर राज्य सरकार विरोधात पुन्हा तीव्र मूक आंदोलन सुरु करावे लागले”
- पुण्याच्या दिशा समितीचे अध्यक्षपद कुणाकडे जाणार?, राष्ट्रवादी विरुद्ध भाजप संघर्ष पेटणार?
- शिवसेनेनं आपल्या वाट्याचं वनमंत्रिपद देऊन विधानसभा अध्यक्षपद घेऊ नये – भास्कर जाधव
- शिवीगाळ कोणी केली ते योग्य वेळी उघड करेन; देवेंद्र फडणवीस यांचा इशारा