मुंबई : खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्यांनावर धक्कादायक आरोप केले. त्यानंतर किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी सरकारमधील डर्टी डझन यादी घेऊन दिल्लीला गेलेत. तर दुसरीकडे नील सोमय्यांनी अटकपूर्व जामीन अर्जासाठी न्यायालयात धाव घेतली होती. या सगळ्या घडामोडीनंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. अशातच आता नील सोमय्यांना न्यायालयात जाण्यासाठी मीच सांगितले होते असं किरीट सोमय्यांनी सांगितले. त्यामागचं कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नारायण राणेंचा पुन्हा खळबळजनक दावा; संघर्ष वाढणार
नील सोमय्यांनी पीएमसी बँकेत घोटाळा केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावर किरीट सोमय्या म्हणाले की, मला ठाकरे सरकार आणि संजय राऊत यांचे कपडे उतरावयचे होते, त्यांना खंर तर उघडे पाडायचे होते. त्यासाठीच मी नीलला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करायला सांगितले.
बाप, बेटा, 3 सेंट्रल एजन्सी अधिकारी, वसुली एजंट तुरुंगात जाणार; संजय राऊतांचा सूचक इशारा
ते पुढे म्हणाले की, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान मुंबई पोलिसांनी दिलेले स्पष्टीकरण संजय राऊत आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पाहावे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी नील सोमय्या याच्याविरोधात कोणतीही तक्रार, गुन्हांची नोंद काही किंवा पुरावे नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी एक प्रकारे ठाकरे सरकारचे कपडेच उतरवले असल्याचंही त्यांनी म्हटलं. दरम्यान, नील सोमय्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आगामी काळात किरीट सोमय्या कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
Read also:
- कितीही गोंधळ घाला, नवाब मलिक यांचा राजीनामा नाही म्हणजे नाहीच; जयंत पाटलांनी विरोधकांना ठणकावलं
- नवाब मलिकांच्या वेळी जे केले, तेच आताही करणार; प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी राष्ट्रवादी मैदानात
- आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे गोत्यात येणार? ड्रग्झ सापडले नसल्याचा एसआयटीचा अहवाल
- आर्यन खानला दिलासा; चौकशी समितीकडून आली सर्वात महत्त्वाची माहिती
- नारायण राणे हजर हो! दिशा सालियन मृत्यूप्रकरणी राणेंना चौकशीसाठी बोलवले जाणार