अहमदनगर : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर इडीने कारवाई करून त्यांना तुरुंगात टाकले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर देखील इडीने कारवाई करत कोट्यवधी रुपये जप्त केले आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. आता याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी आढावा बैठक पार पडली.
राज्यपालांनी माफी मागण्याचा प्रश्नच नाही; राज्यापालांच्या वक्तव्यांवर आठवले यांची प्रतिक्रिया
नगर येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत इडीच्या कारवाईबाबत निर्णय घेण्यात आला. नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाई बाबत ज्या प्रकारे रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करण्यात आला. त्याचप्रकारे प्राजक्त तनपुरे यांच्यावरील कारवाईबाबत निषेध व्यक्त केला जाईल. तसेच इडीने केलेली कारवाई चुकीची असुन त्याला चोख प्रत्युत्तर दिला जाईल, असंही यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले.
किरीट सोमय्यांच्या पुत्राचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला; मानेवर अटकेची टांगती तलवार
प्राजक्त तनपुरे यांच्या वर झालेल्या इडीच्या कारवाईबाबत बैठकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ, पक्षनिरीक्षक अंकुश काकडे, आमदार आशुतोष काळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले, महिला अध्यक्षा मंजुषा गुंड, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, अविनाश आदिक, शहराध्यक्ष माणिक विधाते, घनश्याम शेलार उपस्थित होते. प्राजक्त तनपुरे यांनी यासंदर्भात अजूनही कोणतेही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे तनपुरे हे भाचे आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्यात कोणत्या घडामोडी घडणार याकडे लक्ष लागून आहे.
Read also:
- आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे गोत्यात येणार? ड्रग्झ सापडले नसल्याचा एसआयटीचा अहवाल
- आर्यन खानला दिलासा; चौकशी समितीकडून आली सर्वात महत्त्वाची माहिती
- नारायण राणे हजर हो! दिशा सालियन मृत्यूप्रकरणी राणेंना चौकशीसाठी बोलवले जाणार
- बाप, बेटा, 3 सेंट्रल एजन्सी अधिकारी, वसुली एजंट तुरुंगात जाणार; संजय राऊतांचा सूचक इशारा
- दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नारायण राणेंचा पुन्हा खळबळजनक दावा; संघर्ष वाढणार