मुंबई : गेल्या महिनाभरापासून महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा संघर्ष काहीसा पेटलेला दिसत आहे. दिवसेंदिवस या संघर्षाची धार वाढताना दिसत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मागे शिवसेनेला गोत्यात आण्यासाठी दिशा सालियन मृत्यू प्रकरण उकरून काढले होते. यावेळी त्यांच्यासोबत नितेश राणे हे देखील उपस्थित होते.
संजय राऊत ढेपाळले, त्यांना आता धड बोलता पण येत नाही – निलेश राणे
दिशा सालियन मृत्यू हा लैंगिक अत्याचारामुळे झाला होता असा आरोप नारायण राणे यांनी यावेळी केला होता. एवढंच नाही तर वारंवार ते दिशा सालियन मृत्यू प्रकरणाबाबत वक्तव्य करत आहेत. आता याच प्रकरणात नारायण राणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्य महिला आयोगाने यासंदर्भात पोलिसांकडून अहवाल मागितला होता. याबाबत पोलिसांनी सादर केलेल्या दिशा सालियन मृत्यू प्रकरण अहवालात कोणतीही संशयित बाब आढळून आलेली नाही. यानंतर राज्य महिला आयोगाने एक आणि दिशा सालियनच्या कुटुंबीयांनी एक अशी वेगवेगळी तक्रार नारायण राणेंच्या विरोधात दिली होती.
ज्या रंगाची गोळी मला चाटून जाईल, तो रंग या देशात…; चंद्रकांत पाटलांचं नवाब मलिकप्रकरणी वक्तव्य
राज्य महिला आयोगाच्या तक्रारीनंतर नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मालवणी पोलीस ठाण्यात याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. आता याच प्रकरणात नारायण राणे यांना ४ मार्च रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. राणे यांचा पाय आता खोलात जाणार की महाविकास आघाडीचा एखादी मंत्री पुन्हा गोत्यात येणार ? हे या चौकशी अंती समोर येणार आहे.
Read also:
- बाप, बेटा, 3 सेंट्रल एजन्सी अधिकारी, वसुली एजंट तुरुंगात जाणार; संजय राऊतांचा सूचक इशारा
- दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नारायण राणेंचा पुन्हा खळबळजनक दावा; संघर्ष वाढणार
- किरीट सोमय्यांच्या पुत्राचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला; मानेवर अटकेची टांगती तलवार
- राज्यपालांनी माफी मागण्याचा प्रश्नच नाही; राज्यापालांच्या वक्तव्यांवर आठवले यांची प्रतिक्रिया
- नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही तर भाजपा अधिवेशन चालू देणार नाही – चंद्रकांत पाटील