रत्नागिरी : मनी लॉंड्रीग प्रकरणी अटकेत असलेल्या राज्याचे नवाब मलिक यांच्यावर भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. नवाब मलिक हे इब्राहिम दाऊद चा खरा फंट मँन बन असु शकतो, असं धक्कादायक वक्तव्य देखील निलेश राणे यांनी केले आहे.
वडिलांना धुणी-भांडी करण्याची भीती, चिरंजीवला दिल्लीची स्वप्ने; भातखळकरांची टीका
कुख्यात गुंड दाऊदच्या माणसाकडून कवडीमोल भावात नवाब मलिक यांनी जमीन खरेदी केली. त्यातही ब्लँक मनीचा वापर झाला आहे. त्याचमुळे याचा ट्रेंड ईडी घेतंय. दाऊद हा देशाचा एक नंबरचा शत्रू आहे. बॉम्ब स्फोट घडवणाऱ्यांकडछन तुम्ही जमीन खरेदी करता, यामुळे दाऊदचा खरा फंड मँन नवाब मलिक असू शकता असा खळबळजनक दावा देखील निलेश राणे यांनी केला आहे.
संजय राऊतांनी पंतप्रधान कार्यालयात जमा केले पुरावे; कारवाईची मागणी
खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना निलेश राणे म्हणाले की, शिवसेना आता अनेक विषयात अडचणीत आली आहे. संजय राऊत पुर्णपणे ढेपाळले आहेत. आता त्यांना ते धड बोलूपण शकत नाहीत, अशी अवस्था झाली आहे. तसेच शरद पवार यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, शरद पवार हे गंभीर विषयावर बोलत नाहीत. नबाव मलिक यांच्यासाठी राष्ट्रवादी रस्त्यावर उतरते. नबाव मलिकांचे हे प्रकरण गंभीर आहे. देशाच्या संरक्षणासाठी हे प्रकरण धोका दायक आहे. मलिक यांचा राजीनामा राष्ट्रवादीने घ्यायला पाहिजे, पण पवार साहेबांनी अशा लोकांना पक्षात ठेवता कामा नये.
Read also:
- युक्रेनमध्ये झालेल्या हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
- 4 मंत्री युक्रेनला पाठवून भाजपचा राजकीय इव्हेंट; भुजबळांचा केंद्र सरकारवर घणाघात
- ईडीने बंदूक दाखवली तो डेकोरेटर कुठे ? सोमय्यांचा ठाकरे सरकारला सवाल
- राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून; नवाब मलिकांचा मुद्दा अधिवेशनात गाजणार?
- अन्य दोन पक्ष वाया गेले, आमची अपेक्षा फक्त उद्धव ठाकरेंकडे – आशिष शेलार