मुंबई : गेल्या महिनाभरापासून महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा संघर्ष काहीसा पेटलेला दिसत आहे. दिवसेंदिवस या संघर्षाची धार वाढताना दिसत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मागे शिवसेनेला गोत्यात आण्यासाठी दिशा सालियन मृत्यू प्रकरण उकरून काढले होते. यावेळी त्यांच्यासोबत नितेश राणे हे देखील उपस्थित होते.
4 मंत्री युक्रेनला पाठवून भाजपचा राजकीय इव्हेंट; भुजबळांचा केंद्र सरकारवर घणाघात
दिशा सालियन मृत्यू हा लैंगिक अत्याचारामुळे झाला होता असा आरोप नारायण राणे यांनी यावेळी केला होता. त्यानंतर नारायण राणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्य महिला आयोगाने यासंदर्भात पोलिसांकडून अहवाल मागितला होता. या अहवालात काहीही संशयास्पद माहिती न मिळाल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्या विरोधात मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतरही नारायण राणे यांनी या प्रकरणी पुन्हा वक्तव्य केलं आहे.
युक्रेनमध्ये झालेल्या हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
दिशा सालियन ही गेल्या अडीच वर्षांपासून आपल्या आईवडिलांसोबत राहत नव्हती. ती रॉय नावाच्या एका मुलासोबत राहत होती. तिचे आईवडिलांसोबत संबंध चांगले नव्हते. तिच्या मृत्यूनंतर आम्ही तिला न्याय देण्याचा प्रयत्न करत असताना तिच्या आई वडिलांनी आमची बाजू घ्यायला हवी असं देखील नारायण राणे यांनी म्हटलं आहे. या उलट मुंबईच्या महापौर तिच्या घरच्यांना घेऊन पोलीस ठाण्यात जातात काय ? आमच्यावर गुन्हा नोंदवता काय ?. शिवसेनेला घबराट आहे की जर दिशा सालियनची केस पुन्हा रिओपन झाली तर सध्याचे काही मंत्री जेलमध्ये जाऊ शकतात. त्यामुळेच सध्या त्यांचा हा आटापिटा सुरु आहे. त्यांना वाटत असेल की मी शांत बसेल. पण मी शांत बसणाऱ्यातला नाही आणि एखादी गोष्ट जर मी बोललो तर तिला तडीस नेणार असं देखील राणेंनी म्हटलं आहे.
Read also:
- किरीट सोमय्यांच्या पुत्राचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला; मानेवर अटकेची टांगती तलवार
- राज्यपालांनी माफी मागण्याचा प्रश्नच नाही; राज्यापालांच्या वक्तव्यांवर आठवले यांची प्रतिक्रिया
- नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही तर भाजपा अधिवेशन चालू देणार नाही – चंद्रकांत पाटील
- ज्या रंगाची गोळी मला चाटून जाईल, तो रंग या देशात…; चंद्रकांत पाटलांचं नवाब मलिकप्रकरणी वक्तव्य
- संजय राऊत ढेपाळले, त्यांना आता धड बोलता पण येत नाही – निलेश राणे