मुंबई : गेल्या महिनाभरापासून महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा संघर्ष काहीसा पेटलेला दिसत आहे. दिवसेंदिवस या संघर्षाची धार वाढताना दिसत आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप संघर्षात एकमेकांची उणीदुणी काढण्यात आता नेत्यांना रस आलेला आहे.
4 मंत्री युक्रेनला पाठवून भाजपचा राजकीय इव्हेंट; भुजबळांचा केंद्र सरकारवर घणाघात
भारतीय जनता पक्षाकडून किरीट सोमैया हे सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट करत आहेत. साखर कारखाने घोटाळे, भ्रष्टाचाराची प्रकरणे, नेत्यांच्या निकटवर्तीयांची प्रकरणे बाहेर काढणे हे काम सोमैया करत आहेत तर दुसरीकडून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत हे दुसऱ्याबाजूने महाविकास आघाडीची कमान सांभाळत आहे.
युक्रेनमध्ये झालेल्या हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. कुख्यात दहशतवादी दाऊद सोबत झालेल्या जमिनीच्या व्यवहाराप्रकरणी नवाब मलिक यांना सध्या अटक करण्यात आली आहे. दुसरीकडं संजय राऊत यांनी मागच्या काही दिवसांमध्ये अत्यंत स्पोटख अशी एक पत्रकार परिषद घेतली होती, ज्यामध्ये त्यांनी किरीट सोमैया यांच्या मुलाने केलेल्या भ्रष्टाचाराबाबत वक्तव्य केले होते. आता त्याच प्रकरणी निल सोमैया यांनी सत्र न्यायालयात केलेल्या जामिनाच्या अर्जाला न्यायाधीश दीपक भागवत यांनी फेटाळून लावले आहे.
संजय राऊत ढेपाळले, त्यांना आता धड बोलता पण येत नाही – निलेश राणे
जामीन अर्ज फेटाळल्यामुळे आता निल सोमैया यांच्या अटकेची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आज सकाळीच संजय राऊत यांनी याबाबत सूचक ट्विट केले आहे. माझे शब्द अधोरेखित करा … मी पुनरावृत्ती करतो: “बाप बेटा जेल जायेंगे”. कालावधी.आणि खात्री बाळगा, बाप आणि बेटा व्यतिरिक्त, 3 सेंट्रल एजन्सी अधिकारी आणि त्यांचे “वासुली एजंट” देखील तुरुंगात जातील.महाराष्ट्र झुकेगा नाही! असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.
Read also:
- दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नारायण राणेंचा पुन्हा खळबळजनक दावा; संघर्ष वाढणार
- किरीट सोमय्यांच्या पुत्राचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला; मानेवर अटकेची टांगती तलवार
- राज्यपालांनी माफी मागण्याचा प्रश्नच नाही; राज्यापालांच्या वक्तव्यांवर आठवले यांची प्रतिक्रिया
- नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही तर भाजपा अधिवेशन चालू देणार नाही – चंद्रकांत पाटील
- ज्या रंगाची गोळी मला चाटून जाईल, तो रंग या देशात…; चंद्रकांत पाटलांचं नवाब मलिकप्रकरणी वक्तव्य