मुंबई : ड्रग्ज प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला आता मोठा दिलासा मिळाला आहे. एनसीबीने स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीने याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे आर्यन खानला या प्रकरणातून मुक्तता देखील मिळण्याची शक्यता आहे.
ज्या रंगाची गोळी मला चाटून जाईल, तो रंग या देशात…; चंद्रकांत पाटलांचं नवाब मलिकप्रकरणी वक्तव्य
एनसीबीने स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीने असं म्हटलं आहे की, कॉर्डेलिया क्रुझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीमध्ये शाहरुख खान चा मुलगा आर्यन खानकडे कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ नव्हते. त्याचबरोबर आर्यन चा कोणत्याही मोठ्या ड्रग्ज रँकेटशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही तर भाजपा अधिवेशन चालू देणार नाही – चंद्रकांत पाटील
ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने असं म्हटलं आहे की अरबाज मर्चंट याच्याकडे ड्रग्ज सापडले होते. हे ड्रग्ज तो आर्यन खानसाठी घेऊन आला होता. त्याचबरोबर हे ड्रग्ज आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रँकेटकडून आणल्याचा दावा एनसीबीने केला आहे. आर्यन खानला अटक केल्यानंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या. आरोप- प्रत्यारोप करण्यात आले होते. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलचं तापलं होतं. आता या चौकशीवरून आर्यन खानला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Read also:
- नारायण राणे हजर हो! दिशा सालियन मृत्यूप्रकरणी राणेंना चौकशीसाठी बोलवले जाणार
- बाप, बेटा, 3 सेंट्रल एजन्सी अधिकारी, वसुली एजंट तुरुंगात जाणार; संजय राऊतांचा सूचक इशारा
- दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नारायण राणेंचा पुन्हा खळबळजनक दावा; संघर्ष वाढणार
- किरीट सोमय्यांच्या पुत्राचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला; मानेवर अटकेची टांगती तलवार
- राज्यपालांनी माफी मागण्याचा प्रश्नच नाही; राज्यापालांच्या वक्तव्यांवर आठवले यांची प्रतिक्रिया