मुंबई : मागच्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात एक प्रकरण कमालीचे गाजले होते. हे प्रकरण दुसरे तिसरे कोणते नसून आर्यन खान ड्रग्झ प्रकरण. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दबंग कारवाई केली होती असं त्यावेळी बोललं जात होतं. एनसीबीचे समीर वानखेडे आता महाराष्ट्रात खूप मोठे धमाके करणार असं देखील त्यावेळी बोललं जातं होतं.
ज्या रंगाची गोळी मला चाटून जाईल, तो रंग या देशात…; चंद्रकांत पाटलांचं नवाब मलिकप्रकरणी वक्तव्य
त्यावेळी समीर वानखेडेंच्या या कारवाईवर फक्त एका व्यक्तीने संशय व्यक्त केला होता आणि ती व्यक्ती म्हणजे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक. नवाब मलिक यांनी हे प्रकरण झाल्यानंतर सर्वात प्रथम पत्रकार परिषद घेतली होती आणि हे प्रकरण बनावट आहे असं देखील म्हटलं होतं. मात्र त्यावेळी सर्वांनी नवाब मलिक यांची खिल्ली उडवली होती.
नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही तर भाजपा अधिवेशन चालू देणार नाही – चंद्रकांत पाटील
हे प्रकरण काहीसं वादग्रस्त असल्यानं एनसीबीने याप्रकरणात चौकशी साठी एसआयटी पथकाला सांगितले होते. आता एसआयटीने दिलेल्या माहितीनुसार त्यावेळी आर्यन खानकडे ड्रग्झ सापडले नव्हते असं समोर आलं आहे. एवढंच नाही तर हा सर्व बनावट कटाचा भाग होता असं देखील बोललं जात आहे. महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी कॉर्डिलिया क्रुझवर धाड घातली तेव्हा एनसीबीच्या नियमांप्रमाणे त्याचे व्हीडिओ चित्रीकरण करण्यात आले नव्हते, असेही एसआयटीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. गुन्ह्यात अटक केलेल्या अनेक आरोपींकडून जप्त केलेले ड्रग्ज सिंगल रिकव्हरी म्हणून दाखवले आहेत, असेही एसआयटीने म्हटले आहे.
राज्यपालांनी माफी मागण्याचा प्रश्नच नाही; राज्यापालांच्या वक्तव्यांवर आठवले यांची प्रतिक्रिया
या प्रकरणात एनसीबीने आर्यन खानचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र न्यायालायने हे आरोप फेटाळून लावले होते. आर्यन खानच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप चॅट्स पाहिल्यास त्यात काहीही आक्षेपार्ह दिसत नाही आणि आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाझ मर्चंट व मुनमुन धमेचा या तिघांनी कोणतेही कट कारस्थान रचल्याचे त्यातून स्पष्ट होत नाही असं देखील एसआयटीने निरीक्षणात म्हटलं आहे.
Read also:
- आर्यन खानला दिलासा; चौकशी समितीकडून आली सर्वात महत्त्वाची माहिती
- नारायण राणे हजर हो! दिशा सालियन मृत्यूप्रकरणी राणेंना चौकशीसाठी बोलवले जाणार
- बाप, बेटा, 3 सेंट्रल एजन्सी अधिकारी, वसुली एजंट तुरुंगात जाणार; संजय राऊतांचा सूचक इशारा
- दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नारायण राणेंचा पुन्हा खळबळजनक दावा; संघर्ष वाढणार
- किरीट सोमय्यांच्या पुत्राचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला; मानेवर अटकेची टांगती तलवार