मुंबई : राज्यातील अलिकडच्या सत्तासंघर्षानंतर महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळेच वळण लागले. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठ्या प्रमाणात फटका बसला. शिवसेना नेमकी कुणाची? यावर अजून निर्णय झाला नाही. परंतु त्याआधी आता उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. यासाठी मातोश्रीवर विविध मतदारसंघातील विकास कामांचा आढावा उद्धव ठाकरे यांच्याकडून घेतला जात आहे.
“राणा, कंभोज, खोत, सदावर्ते, पडळकरांना आता फडणवीसांनी गुजरातला पाठवावे”
आगामी निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदेंची बाळासाहेबांची शिवसेना एकत्रित लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे सध्या उद्धव ठाकरेंकडून विधानसभा मतदारसंघानिहाय कामाचा आढावा घेतला जात आहे. मुख्य: त करून एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांच्या मतदारसंघात नव्या नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
“रवी राणांनी माझी माफी मागितली, त्यांचे जाहीर आभार”; बच्चू कडूंनी वाद मिटवला
मागील निवडणुकीतील आकडेवारी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची चर्चा करत याठिकाणी पुढील निवडणुकीत कुणाला उभे करायचं याचा आढावा घेतला जात आहे. इतकेच नाही तर त्या मतदारसंघातील कट्टर शिवसैनिकाला पुढे आणून बंडखोरांविरोधात उभे करण्याचंही ठाकरे विचार करत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा-विधानसभा निवडणुकीची आतापासून तयारी सुरू केली आहे. त्यासाठी मातोश्रीवर रोज बैठका लावल्या जात आहेत.
“प्रहार काही आंडूपांडूचा पक्ष नाही, प्रहारमध्ये दहा वार करण्याची ताकद”; बच्चू कडू
दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी एकत्रित निवडणुका लढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे भाजप- शिंदे आणि मनसे यांची महायुती होण्याची परिस्थिती मागील काही राजकीय घडामोडींवरून दिसत आहेत. तर काॅंग्रेसची स्थिती अजूनही आलबेलच्या अवस्थेमध्ये सापडली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी बघायला मिळणार आहेत.
Read also
- “उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक शिंदे गटात”; ठाकरेंच्या पक्षाला गळती सुरूच
- “निवडणुका जिंकलो काय, निवडणुक हरलो काय, पण..:” गुलाबराव पाटलांचं सुचक वक्तव्य
- “मग हे संघ भाजपवाले युपी, गुजरातच्या अंगणात पाणी भरतील”; राष्ट्रवादीने डिवचलं
- “भाजप अन् बाळासाहेबांची शिवसेना महाराष्ट्राला उंचीवर नेणार”
- “रवी राणा यांचा राजीनामा घेतला गेला नाही तर..:” सुषमा अंधारेंनी साधला निशाणा