नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा फटका बसला आहे. शिवसेनेचे 40 आमदार आणि 12 खासदारांसह असंख्य पदाधिकारी शिंदेंची बाळासाहेबांची शिवसेना पक्षात त्यांनी प्रवेश केला आहे. यातच उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणारे नाशिक सेनेचे माजी पदाधिकारी वंसत पाटील यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे.
“रवी राणांनी माझी माफी मागितली, त्यांचे जाहीर आभार”; बच्चू कडूंनी वाद मिटवला
नाशिकमधील आमदार-खासदार यांच्यानंतर आता स्थानिक पदाधिकारी शिंदे गटात जात असल्याने आता शिंदे गटाची संघटनात्मक पातळीवर ताकद वाढत आहे. नाशिकच्या पाथर्डी आणि इंदिरानगर परिसरात उद्धव ठाकरे यांचे अत्यंत कट्टर मानले जाणारे शिवसैनिक वसंत पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. वसंत पाटील हे शिवसेनेचे माजी नगरसेवक सुदाम डेमसे यांच्या जवळचे पदाधिकारी होते. याशिवाय डेमसे यांचे विश्वासू म्हणून देखील त्यांची ओळख होती.
“प्रहार काही आंडूपांडूचा पक्ष नाही, प्रहारमध्ये दहा वार करण्याची ताकद”; बच्चू कडू
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अनेक कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहेत. एकीकडे शिंदे गटात काही पदाधिकारी प्रवेश करत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना देखील विविध संघटनांचा मोठा पाठींबा मिळत आहे. राज्यातील अनेक राजकीय पक्षातील आजी माजी नेते उद्धव ठाकरे गटात प्रवेश करताना दिसत आहेत.
“सत्ता चुलीत गेली, आम्ही जनसामान्यांसाठी सरकारला पाठींबा दिला”; बच्चू कडूंचा एल्गार प्रहार
दरम्यान, येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजप अन् बाळासाहेबांची शिवसेना युती करण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे देखील मोठी तयारी करताना दिसत आहेत. मातोश्रीवर दररोज यासंदर्भात विविध नेत्यांच्या बैठका सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात निष्ठावंत शिवसैनिकांची चाचपाणी देखील उद्धव ठाकरे कडून केली जात आहे.
Read also
- “निवडणुका जिंकलो काय, निवडणुक हरलो काय, पण..:” गुलाबराव पाटलांचं सुचक वक्तव्य
- “मग हे संघ भाजपवाले युपी, गुजरातच्या अंगणात पाणी भरतील”; राष्ट्रवादीने डिवचलं
- “भाजप अन् बाळासाहेबांची शिवसेना महाराष्ट्राला उंचीवर नेणार”
- “रवी राणा यांचा राजीनामा घेतला गेला नाही तर..:” सुषमा अंधारेंनी साधला निशाणा
- “राणा, कंभोज, खोत, सदावर्ते, पडळकरांना आता फडणवीसांनी गुजरातला पाठवावे”