मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात रोजगाराच्या संधीत महायुती सरकारपेक्षा जास्त वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. प्रफुल्ल सारडा यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या आकडेवारीवरून भाजपचे तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात सर्वात जास्त रोजगार निर्मिती झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या यादीत ठाकरेंच वरचढ ठरतांना दिसत आहे.
हेही वाचा…“मुख्यमंत्री आले आणि गेले, ‘कोट्यावधी रूपयांचा झाला’ चुराडा, कॅबिनेट बैठक चर्चेत
देवेंद्र फडणवीस यांच्या ६० महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रातल्या लघू व सुक्ष्म उद्योगांची स्थिती बिकट होती. त्यांच्या ३० ऑक्टोंबर २०१४ ते नोव्हेंबर २०१९ दरम्यानच्या काळात लघू व मध्यम उद्योगात १४,१६,२२४ कोटी रूपयांची गुंतवणुक करण्यात आली. यामधून फक्त ६२,३६,८७८ रोजगार निर्मिती झाली तर उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात फक्त ३० महिन्यात १८,६८,०५५ कोटी रूपयांची गुंतवणूकीतून ८८४७,९०५ रोजगार निर्मिती झाली आहे. त्यामुळे फडणवीसपेक्षा ठाकरेंचं काम यामधून दिसून आलं आहे.
हेही वाचा…“फडणवीसांना घडवण्यात माझा मोठा वाटा, मात्र नंतरच्या काळात फडणवीसांनी कुरघोडी केली”
दरम्यान, अवघ्या ३० महिन्यांच्या कालावधीत उद्योगांमध्ये भरघोस अशी ३५% नी वाढ झाली. रोजगाराच्या संधीमध्येही ४२% नी वाढ झाली आणि हे सगळं गद्दारी करून सरकार पडण्याआधी केवळ ३० महिन्यांच्या कालावधीत, कोरोना संकटाच्या काळात करुन दाखवलं. महाराष्ट्राला अग्रेसर ठेवणारं सरकार जर गद्दारी करून पाडलं गेलं नसतं, तर महाराष्ट्राची कितीतरी पट भरभराट इतक्यात झाली असती. उद्धव ठाकरे यांची दूरदृष्टी, नैपुण्य आणि मविआतील सर्वच सहकाऱ्यांची साथ या जोरावर महाराष्ट्राला सोन्याचे दिवस आले असते. पण आत्ताचे हे लुटमारीचे, गद्दारीचे दिवस लवकरच जातील आणि पुन्हा मविआ सरकार येईल, कारण महाराष्ट्राच्या जनतेला पक्कं ठाऊक आहे, महाराष्ट्रप्रेमी कोण आहे आणि महाराष्ट्रद्रोही कोण आहे ? असा सवाल शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलाय.
उद्धवसाहेब ठाकरेंचं नेतृत्व असलेलं महाविकास आघाडीचं सरकारच महाराष्ट्रासाठी सर्वोत्तम काम करत होतं ह्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं!
प्रफुल्ल सारडा जी ह्यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या आकडेवारीवरुन हे स्पष्ट होतंय की भाजपच्या फडणवीस सरकारपेक्षा उद्धवसाहेब ठाकरेंच्या… pic.twitter.com/WljE3e6Jwx
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 17, 2023
READ ALSO :
हेही वाचा…सुषमा अंधारेंच्या विभक्त पतीवर ह’ल्ला, गाडीच्या काचाही फोडल्या, वाघमारे गंभीर जखमी
हेही वाचा…“ओबीसी आरक्षणाला धक्का नाही, कोणावरही अन्याय होणार नाही”, उपमुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना दिली ग्वाही
हेही वाचा…दुष्काळी मराठवाड्याला मंत्रिमंडळ बैठकीत काय मिळाले?; पाहा संपूर्ण यादी…
हेही वाचा…मराठवाडा वॉटरग्रिडचा मुद्दा गाजला, फडणवीसांची ठाकरेंवर टिका, आता दानवेंनी फडणवीसांना दिलं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“पाठपुरावा करा, मंत्रीपद हे फक्त मिरवण्यासाठी नाही”, अजित पवारांनी मंत्र्यांनाच दिला दम