बीड : ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांच्यावर काल मध्यरात्री हल्ला झाला आहे. अज्ञात इसमांनी वैजनाथ यांना एकटं गाठून त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यातून सुदैवाने वाघमारे बचावले आहेत. मात्र, हल्ल्यानंतर वाघमारे चांगलेच भयभीत झाले आहेत.
हेही वाचा…“फडणवीसांना घडवण्यात माझा मोठा वाटा, मात्र नंतरच्या काळात फडणवीसांनी कुरघोडी केली”
रात्री झालेल्या दगडफेकीत वैजनाथ वाघमारे यांना जबर मार लागला असून त्यांच्या मुलाला आणि पुतण्याही यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. यावेळी अज्ञांनी गाडीच्या काचाही फोडल्या, त्यामुळे वाघमारे चांगलेच हादरून गेले आहेत. वाघमारे भयभीत झाले असून त्यांनी आपल्या मनातील खदखदही बोलून दाखवली आहे. मला सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली आहे.
हेही वाचा…“अमोल मिटकरींना निरमा पावडर अन् दुध गिफ्ट पाठवणार,” मिटकरी विरोधात रोहित पवार गट आक्रमक
दरम्यान, माझ्यावरील हल्ल्याने आमचं कुटुंब हादरून गेलं आहे. आमच्या जीवाला धोका आहे. हल्लेखोर कोण माहीत नाही. या हल्ल्याची चौकशी व्हावीच, पण कृपया मला आणि माझ्या कुटूंबाच्या जीविताला धोका असल्याने मला सुरक्षा पुरवावी, अशी मागणीच वाघमारे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे वाघमारे यांना सुरक्षा पुरवली जाते का ? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“ओबीसी आरक्षणाला धक्का नाही, कोणावरही अन्याय होणार नाही”, उपमुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना दिली ग्वाही
हेही वाचा…दुष्काळी मराठवाड्याला मंत्रिमंडळ बैठकीत काय मिळाले?; पाहा संपूर्ण यादी…
हेही वाचा…मराठवाडा वॉटरग्रिडचा मुद्दा गाजला, फडणवीसांची ठाकरेंवर टिका, आता दानवेंनी फडणवीसांना दिलं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“पाठपुरावा करा, मंत्रीपद हे फक्त मिरवण्यासाठी नाही”, अजित पवारांनी मंत्र्यांनाच दिला दम
हेही वाचा…“मुख्यमंत्री आले आणि गेले, ‘कोट्यावधी रूपयांचा झाला’ चुराडा, कॅबिनेट बैठक चर्चेत