नागपुर : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांशी, नागरिकांशी संवाद साधत आहेत. याआधी त्यांची अमरावती येथे जाहिर सभा पार पडली. त्यानंतर लगचेच त्यांची आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाल्लेकिल्ल्यात नागपुर येथे जाहिर सभा होत आहे. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांची जुनी क्लिप ऐकून दाखविली. यावरून आता फडणवीस काय प्रतिक्रिया देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…“तेव्हा तुमचा जन्मही झाला नव्हता”, छगन भुजबळांनी रोहित पवारांना सुनावलं
याआधी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन. परंतु येतांनी ते एकटा नाही तर दोन जणांना घेऊन आले आहेत. त्यांनी २०१४ च्या निवडणुकीच्या अगोदरची व्हिडीओ क्लिप ऐकून दाखवली. मी अविवाहित राहिन, पंरतु राष्ट्रवादीशी युती करणार नाही म्हणजे नाही ही क्लिप उद्धव ठाकरे यांनी भर सभेत एकून दाखविली.
हेही वाचा…आम आदमी पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी मयूर दौंडकर यांची नियुक्ती..! सामान्य कुटुंबातून आलेल्या युवकाला ‘आप’कडून मोठी जबाबदारी
२०१४ साली सगळं काही झालं होतं. उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस आला होता. त्या दोन दिवसाच्या अगोदर एकनाथ खडसे यांनी मला फोन करून युती होणार नाही. असं म्हटलं होतं. त्यामुळे पाठीत मी नाही तर भाजपने खंजीर खुपसला. त्यावेळी मी युती तोडली नाही तर भाजपने तोडली. परंतु आता काय झालं. शिवसेनेचे हिंदुत्व तेच आहे. आणि शिवसेनेने हिंदुत्व सोडलं नाही, त्याही वेळेला आम्ही हिंदुच होतो, आजही आहोत आणि मरू त्यानंतर सुद्धा हिंदूच राहणार असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…“…म्हणूनच, आई-वडिलांची अन् पोहरादेवीची शपथ घ्यावी लागते”, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
हेही वाचा…“…म्हणूनच, आई-वडिलांची अन् पोहरादेवीची शपथ घ्यावी लागते”, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
हेही वाचा…“..म्हणून देवेंद्र फडणवीस कार्यक्रमासाठी आले नाहीत,” भर कार्यक्रमात अजित पवारांनी सांगितलं कारण
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरतील, विधानसभा उपाध्यक्षाचं मोठं विधान
हेही वाचा…राज्यातील काॅंग्रेसच्या बड्या नेत्यांची टीम दिल्लीत, मोठ्या राजकीय हालचाली सुरू