मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या अमरावतीच्या दौऱ्यावर असून त्यांनी आपल्या जाहीर भाषणात भाजपवर सडकून टिका केली. केंद्र सरकारच्या अनेक योजना पेट्रोल पंपावर व इतर ठिकाणी लटकवल्या आहेत. परंतु या योजना केंद्र सरकारच्या कोणत्याही नागरिकांना मिळाल्या नाहीत. त्यामुळे आता या योजनांची चर्चा चहाच्या टपऱ्यावर होत आहे. असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. त्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर भाष्य केलं आहे.
हेही वाचा…“शरद पवार साहेबांवर बोलण्याइतपत तुमची लायकी नाही”, राष्ट्रवादी सदाभाऊ खोत विरोधात आक्रमक
भाजपाशी बेईमानी केल्यावर त्यांच्या नेत्यांवर उद्धव ठाकरे टीका करीत आहेत, ते राजकारणातील खालच्या स्तरावर उतरले आहेत. म्हणूनच ते आई-वडिलांची आणि पोहरादेवीची शपथ घेत आहेत, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ते नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधत होते. उद्धव ठाकरे यांची स्मृती गेली आहे, असे सांगून श्री बावनकुळे यांनी अमरावती येथील सभेतून उद्धव ठाकरे यांनी भाजपा व नेत्यावर केलेल्या आरोपांचा चांगलाच समाचार घेतला.
हेही वाचा…“बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरूद्ध पार्थ पवार अशी लढत होणार का ?”, रोहित पवारांनी दिलं उत्तर
ते म्हणाले, 2019 मध्ये मतपेटीनेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे असा कौल दिला होता.जनतेने मतपेटीतून निवडून दिलेल्या सरकारला सत्तेवर न येऊ देता तुम्ही शरद पवार सोबत कट करून सत्तेवर आले. त्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना भावासारखा सांभाळले. त्यांना मुख्यमंत्री होऊ न देण्यासाठी शरद पवारांच्या कटाला साथ द्यायची होती तिथे त्यांनी साथ दिली.
हेही वाचा…“सदाभाऊ खोत स्वत:चा डोकं तपासून घ्या, नाहीतर लवकर वेडा होणार”
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी विदर्भ वैधानिक विकास मंडळाला स्थगिती दिली, नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन घेतले नाही, डीपीसीच्या पैसे कमी केले, सिंचन आणि रस्त्यांचा बॅकलॉग वाढला. सत्ता असताना विदर्भाच्या विकासाकडे लक्ष दिले नाही. विदर्भाची जनता त्यांच्यावर नाराज आहे. मुख्यमंत्री झाल्यावर केवळ दोन दिवस मंत्रालयात येत असेल तर हा महाराष्ट्राचा आणि विदर्भाचा अपमान आहे. त्यांच्याकडे नेते नाही आणि मानसेही नाहीत त्यामुळे मीडियाच्या माध्यामतून ते भाजपावर टीका करीत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“..म्हणून देवेंद्र फडणवीस कार्यक्रमासाठी आले नाहीत,” भर कार्यक्रमात अजित पवारांनी सांगितलं कारण
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरतील, विधानसभा उपाध्यक्षाचं मोठं विधान
हेही वाचा…राज्यातील काॅंग्रेसच्या बड्या नेत्यांची टीम दिल्लीत, मोठ्या राजकीय हालचाली सुरू
हेही वाचा…“तेव्हा तुमचा जन्मही झाला नव्हता”, छगन भुजबळांनी रोहित पवारांना सुनावलं
हेही वाचा…आम आदमी पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी मयूर दौंडकर यांची नियुक्ती..! सामान्य कुटुंबातून आलेल्या युवकाला ‘आप’कडून मोठी जबाबदारी