मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. यातच आता दोन्ही गटातील नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहेत. तर आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका कोणते उमेदवार, कोणत्या मतदारसंघातून लढणार ? असे अनेक सवाल आता उपस्थित केले जात आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी मोठं भाष्य केलं आहे.
हेही वाचा…“फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना ५० फोन केलेत, परंतु..”, शिंदेंचा पहिल्यांदाच मोठा गौप्यस्फोट
राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर राष्ट्रवादीतून बारामतीतून कोण निवडणुक लढणार, याबाबत रोहित पवार यांना विचारले असता. त्यांनी सुचक प्रतिक्रिया दिली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरूद्ध पार्थ पवार अशी लढत होणार का ? असा सवाल रोहित पवारांना केला आहे. त्यावर सुप्रिया सुळे विरूद्ध पार्थ पवार असा सामना होणार नाही. असं रोहित पवारांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा…जर मी झालोच पंतप्रधान तर…., उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला
अजितदादा तशी भूमिका घेणार नाहीत. बारामती विधानसभेवर अजित दादाच निवडून येऊ शकतात. दुसरे काही नाही. कुटुंबाच्या बाबतीत अजित दादा तशी भूमिका घेणार नाहीत. अजित पवार यांच्या विरोधात मी निवडणुक लढणार नाही. माझ्या कुटुंबातून कोणीही निवडणुकीसाठी उभं राहणार नाहीत. अजित दादांनी केलेल्या कामांवर अजित दादाच निवडून येणार, तसं लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळेच निवडून येणार. असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सदाभाऊ खोत स्वत:चा डोकं तपासून घ्या, नाहीतर लवकर वेडा होणार”
हेही वाचा…“रूग्णालयात असतांना हुडी घालून कोण फिरत होते”, उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर पलटवार
हेही वाचा…घ्या जगदंबेची शपथ..! फडणवीसांचे फोन का घेतले नाहीत ? बावनकुळेंचा ठाकरेंना सवाल
हेही वाचा…“बाळासाहेबांनी तुम्हाला वाचवलं नाही तर…,” उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा…“हम काले है तो क्या हुआ, हम शिवसेने के साथ है,” अरविंद सामंतांनी शिंदेंना डिवलचं