मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या अमरावतीच्या दौऱ्यावर असून त्यांनी आपल्या जाहीर भाषणात भाजपवर सडकून टिका केली. केंद्र सरकारच्या अनेक योजना पेट्रोल पंपावर व इतर ठिकाणी लटकवल्या आहेत. परंतु या योजना केंद्र सरकारच्या कोणत्याही नागरिकांना मिळाल्या नाहीत. त्यामुळे आता या योजनांची चर्चा चहाच्या टपऱ्यावर होत आहे. असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. त्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…९ दिवस उलटून तरी बिनखात्याचे राष्ट्रवादीचे ९ मंत्री, खातेवाटप का रखडले ? कारण आलं समोर
केंद्र सरकारच्या लोकाहिताच्या योजनांना फसव्या, बोगस म्हणून तुम्ही बांधावर, टपरीवर चर्चा करणार असाल तर होऊ द्या चर्चा. पण सध्या एकच चर्चा आहे की तुम्ही जागोजागी देवाधिकांच्या शपथा का घेताहेत? मग, हिंमत असेल तर एकदा शपथेवर सांगा. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांचे फोन तुम्ही का घेतले नाहीत, घ्या जगदंबेची शपथ असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“आरोप केलेत, चौकशी करा, अन् शिक्षा द्या,” शरद पवारांचं मोदींना प्रत्युत्तर
हिंदुह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुत आहात, तर आता सांगाच तुमचे सुत कोणाशी जुळले होते? घ्या शपथ आणि कळू द्या तुमची वचनबद्धता असं म्हणत चर्चा तर होणारच चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार डिवचलं आहे.
उद्धवजी, केंद्र सरकारच्या लोकाहिताच्या योजनांना फसव्या, बोगस म्हणून तुम्ही बांधावर, टपरीवर चर्चा करणार असाल तर, होऊ द्या चर्चा!!
पण, सद्या एकच चर्चा आहे. ती म्हणजे, तुम्ही जागोजागी देवाधिकांच्या “शपथा” का घेताहात?
मग, असेल हिंमत तर एकदा शपथेवर सांगाच.
2019 च्या विधानसभा…— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) July 10, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“बाळासाहेबांनी तुम्हाला वाचवलं नाही तर…,” उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा…“हम काले है तो क्या हुआ, हम शिवसेने के साथ है,” अरविंद सामंतांनी शिंदेंना डिवलचं
हेही वाचा…“फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना ५० फोन केलेत, परंतु..”, शिंदेंचा पहिल्यांदाच मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा…जर मी झालोच पंतप्रधान तर…., उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला
हेही वाचा…“जानकरांच्या रासपची ‘एक’ला चलो’ ची भूमिका, भाजपने विचार न केल्यास लोकसभेच्या सर्व जागा लढवणार”