अमरावती : राज्यातील आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्ये सध्या जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. माझ्यामुळे अनेक जणांचे गळ्यातले पट्टे निघाले आहे. त्यामुळे आता ते घरातून बाहेर पडले आहेत. असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. त्यावर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
हेही वाचा…“जानकरांच्या रासपची ‘एक’ला चलो’ ची भूमिका, भाजपने विचार न केल्यास लोकसभेच्या सर्व जागा लढवणार”
मी रूग्णालयात असताना हलता देखील येत नव्हतं. पण यांच्या रात्रीच्या हालचाली सुरू होत्या. हुडी घालून कोण फिरत होते. असा सवाल उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना केला आहे. तसेच अमरावती येथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर देखील जोरदार निशाणा साधला आहे.
हेही वाचा…९ दिवस उलटून तरी बिनखात्याचे राष्ट्रवादीचे ९ मंत्री, खातेवाटप का रखडले ? कारण आलं समोर
दरम्यान, कुटुंबामध्ये बदनामी करून घर फोडायचं, कुटुंबाची निंदानालस्ती करायची. आमच्या कुटुंबावर वाटेल ते बोलायचं, परंतु आम्ही तुमच्या कुटुंबावर बोलायचं नाही. हे कुठलं हिंदुत्व? असं म्हणत त्यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला. तसेच एक तरी असा उपरा दाखवा, की दुसऱ्या राज्यात जाऊन दादागिरी करत आहेत. ज्यांच्यावर उपऱ्यांनी आरोप केलेत. आता तेच त्यांच्या पक्षात गेले आहेत. असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…घ्या जगदंबेची शपथ..! फडणवीसांचे फोन का घेतले नाहीत ? बावनकुळेंचा ठाकरेंना सवाल
हेही वाचा…“बाळासाहेबांनी तुम्हाला वाचवलं नाही तर…,” उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा…“हम काले है तो क्या हुआ, हम शिवसेने के साथ है,” अरविंद सामंतांनी शिंदेंना डिवलचं
हेही वाचा…“फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना ५० फोन केलेत, परंतु..”, शिंदेंचा पहिल्यांदाच मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा…जर मी झालोच पंतप्रधान तर…., उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला