मुंबई : आगामी लोकसभा निवडणुका महाविकास आघाडी राज्यात एकत्रित लढणार असल्याने आता जागा वाटपाबाबत चर्चा केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस युती झाली आहे. त्यामुळे आता लोकसभेच्या ४८ जागांबाबत चर्चा केली जात आहे. यातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. तसेच आता महाविकास आघाडीत जागा वाटपाचा कार्यक्रम हा ठरला असल्याचीही चर्चा आहे.
हेही वाचा…“कर्नाटक निवडणुकीसारखा राज्यातील जनता निकाल देण्याच्या भीतीने ‘राष्ट्रवादी’ भाजपच्या टार्गेटवर”
महाविकास आघाडी संदर्भात कोणाताही निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होत असतो. ते निर्णय तीनही पक्षाला मान्य असतात. त्यामुळे महाविकास आघाडीतील एखाद्या नेत्याच्या वक्तव्यावरुन कोणीही वेगळा अर्थ काढू नये असे आवाहन त्यांनी केले. महाविकास आघाडीची एकजूट राहावी अशी आमची भूमिका आहे.स्टॅम्प पेपर द्या मी लिहून देतो की महाविकास आघाडी पुढील निवडणुकीत शंभर टक्के एकत्र राहील, असा ठाम विश्वासही अजित पवारांनी व्यक्त केला.
हेही वाचा…“याद्या तयार, चेहऱ्यावर हसू, लोकसभा निवडणुकीसाठी काॅंग्रेसची बैठक, मोठी भरारी घेण्याच्या तयारीत
यातच आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २३, शिवसेना १८, काॅंग्रेस १, राष्ट्रवादी काॅंग्रेस ०४ आणि एमआयएमला एक जागा जिंकण्यात यश मिळालं होतं. आता शिंदेंच्या बंडामुळे राज्यातील राजकीय समीकरण बदललं आहे. यातच आता २०२४ च्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूका लढल्यास मागच्या असलेल्या जागा तशाच ठेऊन उरलेल्या जागांवर चर्चा करावी. असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…बहुमत असतांनाही आघाडीत बंडखोरी, राष्ट्रवादीचा सभापती, भाजपला दणका, परभणीच्या निवडणुकीची चर्चा
दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने २०१९ च्या जिंकलेल्या शिवसेना ठाकरे गट १८, राष्ट्रवादी ४, काॅंग्रेस १ अशा २३ जागा तशाच ठेवल्या जाणार असल्याची चर्चा आहे. तर यात आता उरलेल्या २५ जागा वाटपाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. तर २०१९ मध्ये काॅंग्रेसने १८ जागा लढविल्या होत्या तर राष्ट्रवादीने ०८ आणि एक जागा अपक्षासाठी सोडली होती. त्यामुळे आता जागा वाटपाचा फार्म्युला कसा ठरणार ते पाहणं महत्वाचं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“उद्धव ठाकरे बेडवर आजारी असतांना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं”
हेही वाचा…माजी मुख्यमंत्री ‘मनोहर जोशीं’ची तब्येत खालवली, रूग्णालयात दाखल, ठाकरे तातडीने रवाना
हेही वाचा…फडणवीसांचे भाषण, केसरकरांच्या डुलक्या, ‘फडणवीस’ म्हणाले, ‘मी पुन्हा येईन,’ ‘केसरकर’ खडकन उठले, व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…“मला स्टॅम्प पेपर द्या, 100 % खात्रीने मी लिहून देतो की..”, अजित पवारांनी केला मोठा ‘हा’ दावा, भाजप संकटात
हेही वाचा…‘भावी मुख्यमंत्री’ होण्याचे लागले डोहाळे, राष्ट्रवादी, शिवसेनानंतर आता काॅंग्रेसलाही लागली लागण, नांदेडमध्ये झळकले बॅनर्स