मुंबई : राज्यातील उद्योग-व्यवसाय तसेच महत्वाचे प्रकल्प गुजरात पळवले जात असतांना महाराष्ट्रातील आघाडीची महानंद डेअरीही केंद्राच्या नॅशनल डेव्हलपेंट बोर्डाला चालवायला देऊन नंतर गुजरातच्या पर्यायाने अमूलच्या घशात घालण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचं कारण देत महानंदर राष्ट्रीय दुद्ध विकास महामंडळाकडे सोपवण्याच्या हालचालींना वेग आलाय. त्यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून राज्यात गुन्हेगारी वाढली,” सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर जहरी टिका
महाराष्ट्रातील दूध उत्पादकांचा हक्काचा आणि कष्टाने उभा केलेला महानंद ब्रॅंड गुजरातच्या घशात घालण्याचे वृत्त समोर आले आहे. एकीकडे महाभेसळ सरकार आल्यापासून राज्यातील उद्योग गुजरातला जात आहेत. त्यात आता महानंद ब्रॅंड संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. असे झाले तर गुजरातमधील अमूल कंपनीला महाराष्ट्रातील मार्केट मिळेल. काॅंग्रेस सरकारच्या काळात सुरू झालेल्या महानंदने शेतकऱ्यांना आधार दिला. आर्थिक प्रगतीची दारे उघडली. मात्र हे महाभेसळ सरकार अश्या बळकट संस्था आणि उपक्रमांना खिळखिळ करून गुजरातच्या पदरात घालत आहे. हे सरकार आपल्याच राज्याचा गळा का घोटत आहे? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
हेही वाचा..“एक दुसऱ्याच्या मानेवर बसण्याची गद्दारांची सुरूवात झालीय”, जागावाटपावरून महायुतीत कलह, ठाकरे गटाची जोरदार टिका
दरम्यान, महानंद एनडीडीबीकडे सोपवण्यापुर्वी कर्मचारी कपात केली जाणार आहे. सध्या महानंदामध्ये सुमारे ९४० कर्मचारी आहेत. एनडीडीबीवर आर्थिक बोजा पडू नये म्हणून किमान ४५० कर्मचाऱ्यांची कपात केली जाईल. यासंदर्भात नागपूरच्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तारात माहिती दिली होती.
READ ALSO :
हेही वाचा…“सत्तेत राहून भुजबळांनी केवळ नातेवाईकांनाच सत्तेचा वाटा दिला”, भुजबळांना ‘या’ समाजाचाही मोठा विरोध
हेही वाचा..“हेच जागा वाटपाचं समीकरण असणार”, अशोक चव्हाणांनी सांगितला आघाडीचा फॉर्म्युला
हेही वाचा…महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉम्युला ठरला का ? जयंत पाटलांची प्रतिक्रिया म्हणाले…
हेही वाचा..ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं..! ‘या’ लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडणार
हेही वाचा…मिरजेत ठाकरे अन् शिंदे गटाचे शिवसैनिक एकमेकांत भिडले, शिवसेना कार्यालयावरून मोठा राडा